घरताज्या घडामोडीलडाख : आयटीबीपी जवानांनी केले १७ हजार फुट उंचीवर ध्वजारोहण

लडाख : आयटीबीपी जवानांनी केले १७ हजार फुट उंचीवर ध्वजारोहण

Subscribe

लडाखमध्ये इंडो-तिबेटिअन बॉर्डर पोलीस जवानांनी (आयटीबीपी) प्रजासत्ताक दिनानिमित्त १७ हजार फुट उंचीवर ध्वजारोहण केले आहे.

लडाखमध्ये इंडो-तिबेटिअन बॉर्डर पोलीस जवानांनी (आयटीबीपी) प्रजासत्ताक दिनानिमित्त १७ हजार फुट उंचीवर ध्वजारोहण केले. त्यांचा हो फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पांढऱ्या पोशाखात असलेल्या अकरा जवानांनी थेट बर्फावर संचलन केले आहे.

- Advertisement -

लडाख येथे सध्या तापमान हे उणे २० डिग्री इतके आहे. मात्र, अशा बिकट वातावरणातही जवानांमध्ये असलेला प्रजासत्ताक दिना उत्साह जराही कमी झालेला पाहिला मिळत नाही. प्रतिकूल परिस्थितीतही देशाचे रक्षण करणाऱ्या या जवांनाचे हे संचलन पाहून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. यावेळी प्रत्येक जवानांच्या हाती गन होती. शिवाय पहिल्या जवानाच्या हाती उंच तिरंगा देखील होता.


हेही वाचा – LIVE : भारतीय प्रजासत्ताक दिन २०२० – जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांच्या हस्ते जम्मूत ध्वजारोहण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -