घरताज्या घडामोडीकोरोना नियंत्रणासाठी ITCने नेजल स्प्रेच्या क्लिनिकल ट्रायलला केली सुरुवात

कोरोना नियंत्रणासाठी ITCने नेजल स्प्रेच्या क्लिनिकल ट्रायलला केली सुरुवात

Subscribe

कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या जगभरात कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. कोरोनाच्या लढाईतील हे एकमेव हत्यार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सध्या जगभरात देश लसीकरणावर अधिक भर देत आहेत. कोरोनाची प्रतिबंधात्मक लस जरी असली तरी अजूनही जगभरातील वैज्ञानिक कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहेत. आजपासून आयटीसीने (ITC) कोरोना नियंत्रणासाठी नेजल स्प्रेची निर्मिती करत असून त्याच्या क्लिनिकल ट्रायलला सुरुवात केली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, सर्व आवश्यक नियामक मंजुरीनंतर आयटीसी कंपनीच्या स्प्रे सेवलॉन ब्रँडच्या अंतर्गत विक्री करण्याची योजना केली आहे. बंगळुरू स्थित असलेल्या आयटीसी लाईफ सायन्स अँड टेक्नोलॉजी सेंटर (LSTC -Life Sciences and Technology Centre)च्या वैज्ञनिकांनी या स्प्रेची निर्मिती केली आहे.

- Advertisement -

याबाबत आयटीसीने एक प्रवक्ते म्हणाले की, सध्या क्लिनिकल ट्रायल सुरू असून आम्ही याबाबत जास्त माहिती जारी करू शकत नाही.

दरम्यान कोविन डॅशबोर्डच्या माहितीनुसार देशात आतापर्यंत ११९ कोटी ८५ लाख २८ हजार ६४२ लसीचे डोस देण्यात आले आहे. यापैकी पहिला लसीचा डोस ७७ कोटी ६५ लाख १५ हजार ९११ जणांनी घेतला आहे. तर ४२ कोटी २० लाख १२ हजार ७३१ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. देशात गेल्या २४ तासांत ९ हजार ११९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३९६ जणांना मृत्यू झाला आहे. तर १० हजार २६४ जण रिकव्हर झाले आहेत. सध्या देशात १ लाख ९ हजार ९४० सक्रिय रुग्ण आहेत.

ICMRचे संचालक डॉ.बलराम भार्गव यांनी दिले स्पष्टीकरण

- Advertisement -

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -