घरदेश-विदेशप्रेमविवाह करणे हा मुलीचा मूलभूत अधिकार, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्वाळा

प्रेमविवाह करणे हा मुलीचा मूलभूत अधिकार, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Subscribe

नवी दिल्ली – प्रेम विवाह करणाऱ्या मुलींसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रेम विवाह किंवा आपल्या मर्जीने लग्न करणे हा प्रत्येक मुलीचा मूलभूत अधिकार असल्याचा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. तसच आपल्या मर्जीने विवाह करणे म्हणजे आपल्या खासगी स्वांतत्र्याचा भाग असल्याचंही न्यायालयाने नमूद केलं आहे.

भारतीय राज्यघटनेतील कलम 21 नुसार प्रत्येक मुलीला आपल्या मर्जी प्रमाणे लग्न करण्याचा अधिकार आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

मुलीने प्रेमविवाह केल्याने तिच्या आई वडिलांनी तिची हत्या केली. याप्रकरणी पीडितेच्या पतीने पोलिसात दाद मागितली. हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात गेलं. आपल्या पत्नीचे अपहरण करून तिला मारण्यात आल्याचा दावा तिच्या पतीने याचिकेत केला होता. धारधार शस्त्रांनी पत्नीवर हल्ला करण्यात आला असा आरोप पतीने केला.

- Advertisement -

या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने महत्वाची टिपण्णी केली आहे. अशा प्रकारच्या घटना घडणे ही बाब आपल्या देशात आता नित्याची झाली आहे. आपल्या मर्जीने विवाह केल्यानंतर त्या मुलीवर अत्याचार केला जातोय. पण एखाद्या मुलीने तिच्या मर्जीने विवाह करणे हा तिच्या मूलभूत हक्काचा भाग आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक मुलीला हा अधिकार दिला आहे, असं उच्च न्यायालयाने म्हंटले आहे.

तसेच, प्रेम विवाह करणाऱ्या किंवा आपल्या मर्जीने लग्न करणाऱ्या जोडप्यांना पोलिसांनी संरक्षण देण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास संबंधित जोडप्यांना  त्वरीत संरक्षण देण्याची गरज आहे. प्रेम विवाह केल्यानंतर मुलीला कुटुंबियांकडून धमक्या येत असतील आणि त्याची तक्रार करण्यात आली असेल तर याकडे पोलिस दुर्लक्ष करतात ही गोष्ट दुर्भाग्यपूर्ण आहे, असंही कोर्टाने म्हंटले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -