घरदेश-विदेशजे.पी. नड्डा पुन्हा अध्यक्ष?; सोमवारच्या बैठकीत होणार निर्णय

जे.पी. नड्डा पुन्हा अध्यक्ष?; सोमवारच्या बैठकीत होणार निर्णय

Subscribe

१६ व १७ जानेवारीला भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. सोमवारी ४ वाजता ही बैठक सुरु होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व अन्य ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. याच बैठकीत नड्डा यांच्याबाबत निर्णय होणार आहे. या निवडीसाठी संघटनात्मक निवडणूक होणार नाही. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत नड्डा यांच्याकडेच राष्ट्रीय अध्यक्षची धुरा दिली जाईल, असे सुत्रांनी सांगितले.

नवी दिल्लीः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची फेरनिवड होणार की त्यांच्या पदी दुसऱ्या कोणत्या तरी नेत्याची वर्णी लागणार याचा निर्णय सोमवारी होणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत होण्याची शक्यता आहे. नड्डा यांचा कार्यकाळ २० जानेवारील संपत आहे.

१६ व १७ जानेवारीला भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्ली येथे बैठक होणार आहे. सोमवारी ४ वाजता ही बैठक सुरु होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व अन्य ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. याच बैठकीत नड्डा यांच्याबाबत निर्णय होणार आहे. या निवडीसाठी संघटनात्मक निवडणूक होणार नाही. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत नड्डा यांच्याकडेच राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा दिली जाईल, असे सुत्रांनी सांगितले.

- Advertisement -

जी-२० परिषदेचे कार्यक्रम.  भाजप खासदार, आमदार व कार्यकर्त्यांचा परिषदेतील सहभाग यावर बैठकीत चर्चा होणार आहे. विरोधी पक्ष नेत्यांची युती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होणाऱ्या आरोपांना कशाप्रकारे उत्तर द्यायचे यावरही बैठकीत मंथन होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत बैठकीत नियोजन केले जाणार आहे. १६० जागांवर भाजपला मताधिक्य कमी आहे. त्या ठिकाणी विजय कसा मिळवता येईल यावरही विचार केला जाणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती व या निवडणुकीतील विजयाचे नियोजन यावर आधारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण असणार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी विजयाचा नेमका काेणता कानमंत्र देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीचे अध्यक्षपद भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

या दोन दिवसांच्या बैठकीत मुखतः संघटना वाढवण्यावर चर्चा होणार आहे. नऊ राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या नियोजनावरही बैठकीत चर्चा होणार आहे. त्रिपुरा, नागालॅंड, मेघालय, कर्नाटक, मिझोराम, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश व तेलंगणा या नऊ राज्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने तेथील भाजपा पदाधिकाऱ्यांना बैठकीत विशेष मार्गदर्शन केले जाईल. निवडणुकांसाठी काय तयारी केली आहे याची माहितीही तेथील पदाधिकाऱ्यांकडून घेतली जाईल व त्यानुसार निवडणुकीचे नियोजन केले जाईल.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -