घरदेश-विदेशशिवसेनेबरोबरच देशातील सर्व प्रादेशिक पक्षही संपतील, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डांचा...

शिवसेनेबरोबरच देशातील सर्व प्रादेशिक पक्षही संपतील, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डांचा दावा

Subscribe

नड्डा यांनी बिहारमधील भाजपच्या १६ जिल्हा पक्ष कार्यालयांचे पाटणा येथून उद्घाटन केले. यावेळी त्यांनी बिहारमधील राजदसह अन्य प्रादेशिक पक्षांवर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी सर्व प्रादेशिक पक्षही संपतील. देशात फक्त भाजप राहील असा दावा केला असून कोणताही पक्ष भाजपला मात देऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा काय म्हणाले –

- Advertisement -

देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे. काँग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळणे सुरू आहे. उर्वरित सर्व प्रादेशिक पक्षही संपतील, देशात केवळ भाजप राहील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येथे केला. कोणताही पक्ष भाजपला मात देऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

काँग्रेस बहीण भावांचा पक्ष –

- Advertisement -

पुढे त्यांनी बिहारमध्ये आम्ही राजदशी लढतो आहोत, तो एका कुटुंबाचा पक्ष आहे. उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टी हादेखील कौटुंबीक पक्ष आहे. ओडिशात नवीन बाबू यांचा पक्ष हा एका व्यक्तिचा पक्ष आहे. महाराष्ट्रात समाप्तीच्या मार्गावर असलेली शिवसेनादेखील एका कुटुंबाचा पक्ष आहे. अशाच प्रकारे काँग्रेस बहीण – भावाचा पक्ष बनला आहे, असी टीका त्यांनी केली

जे अद्याप संपले नाहीत ते देखील संपतील – जे.पी नड्डा

पुढे पाटणा येथे आगमनानंतर झालेल्या भव्य स्वागताचा उल्लेख करून ते म्हणाले की, कालच्या या सोहळ्यावरून भाजपचे सामर्थ्य कसे वाढत आहे, हे लक्षात येते. भाजप सामान्य जनतेशी नाळ जुळलेला पक्ष आहे. काँग्रेसवर टीका करताना ज्यांच्याकडे विचार नाहीत ते एकतर संपले किंवा संपतील. आम्हाला वैचारिक पार्श्वभूमी आहे. आमच्याकडे विचार नसते तर आम्ही एवढी मोठी लढाई लढूच शकलो नसतो. विचार नसलेले लोक संपले. जे अद्याप संपले नाहीत, तेदेखील संपतील. राहील तो फक्त भाजप, असे ते म्हणाले

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -