घरताज्या घडामोडीTwitter च्या सीईओ पदावरून जॅक डोर्सी पायउतार होण्याची शक्यता

Twitter च्या सीईओ पदावरून जॅक डोर्सी पायउतार होण्याची शक्यता

Subscribe

Twitter चे सीईओ जॅक डोर्सी (Twitter CEO Jack Dorsey) आता आपल्या पदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे. डोर्सी यावेळी ट्विटर आणि स्क्वायर या दोन्ही कंपनींमध्ये सीईओच्या पदासाठी काम करत आहेत. परंतु ट्विटरच्या स्टेक होल्डर इलियट मॅनेजमेंटच्या कंपनीने २०२० मध्ये जॅक डोर्सीला सीईओच्या पदावरून हटवण्याची मागणी केली होती. परंतु आतापर्यंत ट्विटरकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार, डोर्सी आता सीईओच्या पदावरून पायउतार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जॅक डोर्सी यांची जागा कोण घेणार?

इलियट मॅनेजमेंटचे संस्थापक आणि अरबपती निवेशक पॉल सिंगर यांनी सांगितलं की, जॅक डोर्सी यांना दोन्ही सार्वजनिक कंपन्यांमधून एका कंपनीचं सीईओ पद सोडलं पाहीजे. जरी आतापर्यंत माहिती नाहीये की, त्यांची जागा आता कोण घेणार आहे. परंतु जर ते पदावरून पायउतार झाले तर पुढच्या काळात येणारा सीईओ ट्विटरच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय कार्य करणे गरजेचे आहे. कंपनीने या वर्षाच्या सुरूवातील सांगितलं होतं की, कंपनीचं लक्ष आता २०२३ पर्यंत ३१५ मिलिअन अॅक्टिव युझर्स करणं आहे. त्यामुळे त्यांचं वर्षभरातील इन्कम मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास मदत होईल.

- Advertisement -

२०१५ मध्ये ट्विटरच्या सीईओचा कार्यभार सांभाळण्यास सुरूवात

जॅक डोर्सी यांनी सोशल मीडिया प्लॅटवरील ट्विटरची स्थापना केली होती. २००८ मध्ये सीईओच्या पदी त्यांनी काम करण्यास सुरूवात केली. २००८ मध्ये त्यांना काही कारणास्तव बाहेर सुद्धा करण्यात आलं होतं. परंतु माजी सीईओ डिक कोस्टोलो यांनी सीईओ पदाचा पदभार सोडल्यानंतर डोर्सी यांनी २०१५ मध्ये ट्विटरच्या सीईओचा कार्यभार सांभाळण्यास सुरूवात केली.


हेही वाचा: मुंबई-कोकण गाड्यांचा विस्तार, संरचना आणि वेळेत कोणताही बदल नाही

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -