Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशJaffar Express : पाक सैन्याकडून रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाल्याचा दावा, पण बीएलए म्हणते...

Jaffar Express : पाक सैन्याकडून रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाल्याचा दावा, पण बीएलए म्हणते…

Subscribe

ओलिसांच्या मुक्ततेसाठी पाकिस्तानने 16 वेळा प्रयत्न केला आणि त्यात 63 पाकिस्तानी सैनिक जखमी झाले. तर, आमचे तीन बंडखोर मारले गेल्याचा दावा बीएलएने केला आहे.

(Jaffar Express) इस्लामाबाद : पाकिस्तानातील बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) जाफर एक्स्प्रेस हायजॅक केली होती. सर्व 33 बंडखोरांचा खात्मा करून रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाल्याचे पाकिस्तानी सैन्याने जाहीर केले आहे. तथापि, बीएलएने याच्या विपरित दावा केला आहे. अद्याप 150हून अधिक पाकिस्तानी नागरिक आमच्याकडे ओलिस आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. शिवाय, क्वेट्टा स्टेशनवर 200 शवपेट्या दिसल्याने एकूण मृतांच्या संख्येबाबतही प्रश्नचिन्ह आहे. (BLA rejects Pakistan Army’s claim)

पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आलेली रेस्क्यू ऑपरेशनबाबतची घोषणा बीएलएने खोडून काढली. ट्रेनमध्ये एकूण 426 प्रवासी होते, ज्यात 214 सैनिक होते. ट्रेन हायजॅक केल्यानंतर तासाभरातच 212 प्रवाशांना सोडण्यात आले. तर, 40 पाकिस्तानी सैनिक आणि 60 ओलिसांना मारण्यात आले. आता आमच्या ताब्यात ताब्यात अजूनही 150हून अधिक पाकिस्तानी नागरिक आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

हेही वाचा – Amit Deshmukh : उद्योग खात्याची श्वेतपत्रिका काढावी, आमदार अमित देशमुख यांची मागणी

पाकिस्तानी सैन्याने बंडखोरांशी वाटाघाटी न करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे पाकिस्तानी सैन्याचे जीव धोक्यात येऊ शकतात, असे मानवाधिकार कार्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांचे म्हणणे आहे. क्वेट्टा रेल्वे स्थानकता 200हून अधिक लाकडी शवपेट्या आणण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. म्हणजेच, चर्चेची दारे बंद ठेवल्याने पाकिस्तानी सैन्याने आपल्याच सैनिकांचा जीव धोक्यात घातला आहे.

क्वेट्टा येथे 30 ते 40 सैनिकांचे मृतदेह आधीच आणण्यात आले आहेत आणि जवळच्या रुग्णालयांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली असल्याचेही अमजद अयुब मिर्झा यांनी सांगितले. ओलिसांच्या मुक्ततेसाठी पाकिस्तानने 16 वेळा प्रयत्न केला आणि त्यात 63 पाकिस्तानी सैनिक जखमी झाले. तर, आमचे तीन बंडखोर मारले गेल्याचा दावा बीएलएने केला आहे.

पाकिस्तानी सैन्याने बुधवारी रात्री जारी केलेल्या निवेदनानुसार, 33 बंडखोरांना ठार करण्यात आले असून सर्व ओलिसांची सुटका करण्यात आली आहे. हवाई दल, फ्रंटियर कॉर्प्स आणि स्पेशल सर्व्हिस ग्रुपने संयुक्तपणे ही कारवाई केली आणि सर्व नागरिकांना वाचवण्यात आले. या हायजॅक नाट्यादरम्यान 21 नागरिकांचा मृत्यू झाला, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – Chandrakant Patil : सहायक प्राध्यापकांच्या 4,435 पदांची लवकरच भरती, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती