Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशJaffar Express : पाकिस्तानी सैन्य म्हणते, मुख्य सूत्रधार अफगाणिस्तानमध्ये, सरकारचे भारताकडे बोट

Jaffar Express : पाकिस्तानी सैन्य म्हणते, मुख्य सूत्रधार अफगाणिस्तानमध्ये, सरकारचे भारताकडे बोट

Subscribe

सध्या भौगोलिक परिस्थिती आणि आत्मघातकी हल्लेखोरांच्या भीतीमुळे पाकिस्तानी सैनिक सावधगिरी बाळगत आहे. ओलिसांना सोडण्यासाठी राजी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रात्रीच 104 जणांना सोडण्यात आले.

(Jaffar Express) इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने मंगळवारी जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक करून 182 प्रवाशांना ओलीस ठेवल्याचे सांगण्यात येते. जवळपास 24 तास उलटून गेले तरी, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्याच (BLA) ताब्यात ही ट्रेन आहे. ट्रेनमधील ओलिस महिला आणि मुलांसह 154 जणांची सुटका केल्याचा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी दावा केला आहे. तर, तेथून परतलेल्या 104 लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना सुरक्षा दलांनी वाचवले नाही तर, बंडखोरांनी सोडले होते. अफगाणिस्तानमध्ये बसलेल्या मुख्य सूत्रधाराच्या इशाऱ्यावर सर्व सुरू असल्याचा दावा सुरक्षा दलांनी केला आहे तर, पाकिस्तानी सरकारने यामागे भारत असल्याचा आरोप केला आहे. (Pakistani government accuses India)

भौगोलिक परिस्थितीमुळे पाकिस्तानी सैन्याला ट्रेनपर्यंत पोहोचणे कठीण होत चालले आहे. तिथे तीन बाजूंनी टेकड्या आणि एका बाजूला बोगदा आहे. त्यातच बंडखोरांकडून प्रवाशांचा ढाल म्हणून वापर केला जात आहे. पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई केली तर, ते आत्मघाती स्फोट घडविण्याचा इशारा बडखोरांनी दिला आहे. हे लक्षात घेऊन काही पावले उचलण्यापूर्वी विचार करावा लागेल, असे पाकिस्तानी सुरक्षा दलांचे म्हणणे आहे. यांचा म्होरक्या अफगाणिस्तानमध्ये बसलेला आहे आणि तोच ही सर्व सूत्रे चालवत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

हेही वाचा – Jaffar Express : प्रत्येकाच्या ओळखपत्राची तपासणी, बलुच लिबरेशन आर्मीच्या निशाण्यावर पंजाबी

सध्या भौगोलिक परिस्थिती आणि आत्मघातकी हल्लेखोरांच्या भीतीमुळे पाकिस्तानी सैनिक सावधगिरी बाळगत आहे. ओलिसांना सोडण्यासाठी राजी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रात्रीच 104 जणांना सोडण्यात आले. त्यात 31 महिला आणि 15 मुले आहेत. तथापि, बंडखोरांच्या कैदेतून सुटलेल्या 104 लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना बंडखोरांनीच सोडले आहे. बंडखोरांनीच प्रवाशांचा मानवी ढाल म्हणून वापर केला आहे. बॉम्ब अंगाला बांधलेला एक बंडखोर प्रत्येक प्रवाशासोबत असल्याचे सांगण्यात येते.

दुसरीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी याप्रकरणी भारतावर निराधार आरोप केले आहेत. ट्रेन अपहरणाच्या घटनेमागे भारताचा हात असल्याचा दावा त्यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना केला आहे. अफगाणिस्तानातून भारत हे ऑपरेट करत आहे. यात काही शंका नाही. त्यांच्यासाठी अफगाणिस्तान ही एक सुरक्षित भूमी आहे, तिथे बसून ते सर्वप्रकरचे प्लॅनिंग करत असतात. अफगाणिस्तानातील तहरीक-ए-तालिबान (TTP) आणि बीएलएला भारताचे पाठबळ आहे, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा – Bangladesh : शेख हसीना आणि कुटुंबीयांची मालमत्ता जप्त होणार, न्यायालयाचे आदेश