घरदेश-विदेशशपथविधीला वडिलांच्या आठवणीचे भावूक झाले जगनमोहन रेड्डी

शपथविधीला वडिलांच्या आठवणीचे भावूक झाले जगनमोहन रेड्डी

Subscribe

वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी आज आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी आज आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजकारणातील अनेक चढउतार पाहिल्यांनतर, कित्येक दिवसांच्या संघर्षानंतर त्यांना राज्याची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली आहे. यावेळी जगनमोहन रेड्डी हे दिवंगत वायएसआर रेड्डी त्यांच्या आठवणीने भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. वायएस राजशेखर रेड्डी यांचा २००९ साली संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यांचे बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर वायू दलाला सापडल्यानंतर रेड्डी यांचा मृतदेहच त्यांच्या हाती लागला होता. त्यानंतर जगनमोहन रेड्डी यांचा राजकीय संघर्ष खऱ्या अर्थाने सुरु झाला. काँग्रेसकडून मिळालेल्या सापत्न वागणुकीनंतर अखेर आज रेड्डी बहुमत मिळवून मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत.

- Advertisement -

आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतर पक्ष प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्रपदाची शपथ घेतली. कार्यक्रम स्थळावर जय्यत तयारीही करण्यात आली होती. जगनमोहन रेड्डी यांनी आज, गुरुवारी दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी आयजीएमसी स्टेडियम येथील कार्यक्रमात शपथ घेतली. त्यांच्या पक्षाने १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवला आहे. तर लोकसभेसाठी २५ पैकी २२ जागांवर खासदार निवडून आले आहेत. रेड्डी यांच्या शपथविधीसाठी राज्यपाल नरसिंह राव बुधवारी दुपारीत हैदराबादला पोहोचले होते.

- Advertisement -

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटवरून मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -