घरदेश-विदेशउपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून जगदीप धनखरांनी भरला अर्ज, विरोधकांकडून मार्गारेट अल्वा आद दाखल करणार...

उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून जगदीप धनखरांनी भरला अर्ज, विरोधकांकडून मार्गारेट अल्वा आद दाखल करणार अर्ज

Subscribe

देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी 6 ऑगस्टला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी एनडीएकडून पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि भाजप नेते जगदीप धनखर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. तर विरोध पक्षांकडून मार्गारेट अल्वा उपराष्ट्रपती पदासाठी आज अर्ज दाखल करणार आहेत.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जगदीप धनखर म्हणाले की, माझा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला आहे. सहावीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी रोज ६ किमीची पायपीट केली, स्कॅलरशिपच्या माध्यमातून पुढील शिक्षण पूर्ण केले. आज एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आला आहे. मला ही संधी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचा मी आभारी आहे. ६ ऑगस्टला होणाऱ्या उपराष्ट्रापती पदाच्या निवडणुकीसाठी अंतिम अर्ज १९ जुलैपर्यंत करता येणार आहे.

- Advertisement -

एनडीएचे उमेदवार धनखर हे राजस्थानच्या जाट समाजातून येतात. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या धनखर यांना उमेदवार करून भाजपने मोठा डाव खेळला आहे. राजस्थान व्यतिरिक्त पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली येथे जाट समाजाची संख्या खूप जास्त आहे. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये धनखर यांची पकड खूप मजबूत मानली जाते.

- Advertisement -

विरोधकांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी

दरम्यान विरोधी पक्षांनीही रविवारी आपला उमेदवार जाहीर केला, विरोधी पक्षाने मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्र पदासाठी उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी विरोधी पक्षांची बैठक झाली. यामध्ये उपराष्ट्रपती पदाचा उमेदवाराच्या नावाची चर्चा होती. यानंतर अल्वा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

मोदी सरकारच्या विरोधातील शेतकरी आंदोलनात जाट शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते. याशिवाय राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये जाट मतदार आणि शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. अनेक मतदारसंघात जाट मतदार निर्णायक भूमिका बजावतात. राजस्थानमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे धनखर यांची उमेदवारी जाहीर करताना भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांना ‘किसान पुत्र’ असे संबोधले. त्यामुळे धनखर यांना उमेदवारी देण्यामागे भाजपची खेळी असल्याचे म्हटले जातेय.

सीएम ममता धनखर यांच्यात अनेकदा संघर्ष

बंगालमधील राजकीय हिंसाचाराच्या संदर्भातही अनेकदा म्हटले होते की, राज्य कसे लोकशाहीचे गॅस चेंबर बनत आहे आणि तेथे मानवाधिकार संकटात आहेत. मुख्यमंत्र्यांनी अनेकवेळा मागितलेली माहिती दिली नाही आणि विधानसभेतील त्यांच्या भाषणाला दोनदा काळे फासले, असे धनखर यांनी सांगताच संतप्त ममतांनी त्यांना ट्विटरवरच ब्लॉक केले. 2022 पर्यंत ममता आणि धनखर यांच्यातील संबंध इतके ताणले गेले की राज्य सरकारने एक विधेयक आणले. जे राज्य विद्यापीठांचे कुलपती यापुढे राज्यपाल नसून मुख्यमंत्री असतील असे जाहीर करणारे होते.


तीन वर्षे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केला, रामदास कदमांचा पत्रातून तक्रारीचा सूर


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -