घरदेश-विदेशराजस्थानच्या सिरोहीमध्ये एका रहस्यमय आजाराने 7 मुलांचा मृत्यू, शहरात खळबळ

राजस्थानच्या सिरोहीमध्ये एका रहस्यमय आजाराने 7 मुलांचा मृत्यू, शहरात खळबळ

Subscribe

राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यात एका रहस्यमय विषाणूजन्य संसर्गामुळे एकूण सात बालकांनी आपला जीव गमावला आहे. मृत पावलेली ही सर्व मुले 12 ते 15 वयोगटातील आहेत. त्यामुळे सर्व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मृत्यू प्रकरणामुळे आता राजस्थान आरोग्य विभाग अॅक्शन मोडमध्ये आले आहे. जिल्हास्तरीय शिक्षणाधिकारी घटनास्थळी पोहोचून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्यावेळी सिरोहीचे जिल्हाधिकारी भवंर लाल यांनी या प्रकरणावर सांगितले की, फुलाबाई खेडेगावात गेल्या दोन ते तीन दिवसांत तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. मात्र हा मृत्यू एका अज्ञात आजारामुळे झाला की विषारी पदार्थ खाल्ल्याने झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

- Advertisement -

राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत सात मुलांच्या मृत्यूमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जयपूर आणि जोधपूर येथील वैद्यकीय पथके सिरोही जिल्ह्यातील फुलाबाई खेडे गावात पाठवण्यात आली आहे. ज्यठिकाणी 11 ते 13 एप्रिलदरम्यान एका रहस्यमय आजारामुळे चार मुलांचा मृत्यू झाला.

गेल्या चार दिवसांत या आजारामुळे सात मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे. मुलांच्या मृत्यूवर तेथील लोकांनी असेही सांगितले की, गेल्या काही दिवसांत सात मुलांचा मृत्यू झाला आहे. मरण पावलेली सर्व मुले 12 ते 15 वयोगटातील आहेत. मरण पावलेली मुले या रहस्यमय विषाणू संसर्गाचे बळी ठरली आहेत.

- Advertisement -

गावातील एका कुटुंबातील राजेश (12), संतोष (15) आणि विपुल (10) या तीन मुलांना अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आणि त्यांच्या नाकातूनही रक्त येऊ लागले. शवविच्छेदनानंतर मृतदेह गावात पोहोचताच संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. घरातील सदस्यांची अवस्था बिकट आहे. बालकांच्या अकस्मात मृत्यूची भीती सर्व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. गावातील इतर मुलांचेही सर्वेक्षण केले जात आहे. आरोग्य विभागाने बालकांची तपासणी करून नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -