(Jaipur fuel pump fire) जयपूर : राजस्थानमधील जयपूर येथे शुक्रवारी पहाटे जयपूर-अजमेर महामार्गावर केमिकलने भरलेला टँकर आणि एलपीजी टँकरची एकमेकांना धडक बसल्याने काही क्षणातच आगीचे तांडव पाहायला मिळाले. या आगीत होरपळून सुमारे सहाजणांचा मृत्यू झाला तर, 40 जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 गाड्या आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल केले आहे.
जयपूर-अजमेर महामार्गावरील भांक्रोटा परिसरात असलेल्या पुष्पाराज पेट्रोल पंपानजीक केमिकल आणि एलपीजी असलेले दोन टँकर एकमेकांना धडकल्यानतंर इतर गाड्यांवरही ते आदळले. टँकरमधील केमिकल जवळपास 500 मीटरपर्यंत पसरले. त्यामुळे आगीने उग्र रूप धारण केले आणि आकाशात आगीचे मोठमोठे लोळ उठल्याचे पाहायला मिळाले. अनेक वाहनांना त्याचा फटका बसला आहे. सुमारे तीन डझन लहान-मोठ्या गाड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. स्लीपर कोच बस, अनेक कार, ट्रक आणि दुचाकीस्वारांना या आगीने घेरले. सुदैवाने ही आग पेट्रोल पंपाच्या टाकीपर्यंत पोहोचली नाही. अन्यथा हा अपघात आणखी गंभीर होऊ शकला असता.
VIDEO | Rajasthan: A gas tanker caught fire on Ajmer Road in #Jaipur earlier today. Several vehicles were also gutted in fire. More details are awaited.#JaipurNews
(Full video available on PTI videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/kIJcm3AQRJ
— Press Trust of India (@PTI_News) December 20, 2024
या आगीत आतापर्यंत सहा जण दगावली असून त्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. 40 जखमींपैकी अनेकांची स्थिती गंभीर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. ही घटना घडली त्याच्याजवळ डीपीएस शाळाही आहे. तर, महामार्गालगत असलेल्या पाइप कारखान्यालाही आग लागली.
यावेळी झालेला हा स्फोट एवढा मोठा होता की, त्याचा आवाज सुमारे पाच किलोमीटर अंतरापर्यंत ऐकायला आला. केमिकल आणि गॅसची गळती झाल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. बचाव पथकाचे सदस्य मास्क घालून मदतकार्य करत होते. आगीची माहिती मिळताच जयपूर शहरातील सर्व अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. तसेच, सुमारे 30 एम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या. आगीमुळे महामार्गावरील वाहनांची वाहतूक रोखण्यात आली होती.
हेही वाचा – Munde in Controversy : सर्वपक्षीय निशाण्यावर धनंजय मुंडे, खातेवाटपापूर्वीच मिळणार नारळ?