घरCORONA UPDATELockdown - बाहेर भटकणाऱ्यांना पोलिसांची भन्नाट शिक्षा, ऐकवणार 'हे' गाणं!

Lockdown – बाहेर भटकणाऱ्यांना पोलिसांची भन्नाट शिक्षा, ऐकवणार ‘हे’ गाणं!

Subscribe

जयपूर पोलिसांनी नामी शक्कल शोधून काढली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडाल तर तुम्हाला एक भन्नाट शिक्षा मिळणार आहे.

सध्या कोरोना एवढीच ए. आर. रेहमान यांच्या ‘मसक्कली’ या गाण्यावरुन सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. ‘मसक्कली’ या गाण्याचं टी सीरिजने रिमेक वर्जन तयार केलं. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि आभिनेत्री तारा सुतारिया यांचे ‘मसक्कली २.०’ हे गाणं सध्या जोरदार चर्चेत आहे. हे गाणं ‘दिल्ली ६’ या चित्रपटातील ‘मसक्कली’ या गाण्याचा रिमेक आहे. मात्र हा गाणं रसिकांना फारसं रूचलं नाही. पण आता हेच गाणं तुम्हाला शिक्षा म्हणून ऐकावं लागणार आहे.

लॉकडाऊनमध्ये घरातून बाहेर पडू नका असं सतरा वेळा सांगूनही लोकं घराबाहेर पडत आहेत. पंतप्रधान, मुख्यमंत्री, सेलिब्रेटींनी सांगूनसुद्धा नागरिक कोणाचचं ऐकायला तयार नाहीयेत. यावर जयपूर पोलिसांनी नामी शक्कल शोधून काढली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडाल तर तुम्हाला एक भन्नाट शिक्षा मिळणार आहे. लॉकडाऊनमध्ये बाहेर पडणाऱ्या नागरिकांना जयपूर पोलिस शिक्षा म्हणून ‘मसक्कली २.०’ हे गाणं ऐकायला लावणार आहेत. आणि हे गाणं एकदा नाही तर लूप लागेपर्यंत हे गाणं ते तुम्हाला ऐकवणार आहेत.

- Advertisement -

जयपूर पोलिसांनी गुरूवारी एक पोस्ट शेअर केली जात लिहीलं होतं, ‘मत उडियो, तू डरियो

- Advertisement -

ना कर मनमानी, मनमानी  घर में ही रहियो , ना कर नादानी, ऐ मसक्कली, मसक्कली’ आणि गाण्याचे हे बोल लिहून पुढे लिहिले आहे की, जर तुम्ही रस्त्यावर इथे तिथे भटकताना दिसलात तर तुम्हाला एका खोलीत टाकून मसक्कली हे गाणं ऐकायला लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -