घरदेश-विदेशBreak The Chain: लग्नाला यायचं हं! पण, येणाऱ्या वऱ्हाड्यांसाठी अनोखी अट

Break The Chain: लग्नाला यायचं हं! पण, येणाऱ्या वऱ्हाड्यांसाठी अनोखी अट

Subscribe

देशात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. तर दुसरीकडे लग्नसराईचा हंगामही सुरू आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून लग्न सोहळे कमी लोकांच्या उपस्थितीत होत आहेत. मात्र जयपूरमधील एका लग्नसोहळ्याच्या आमंत्रणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. जिथे लग्नाला वऱ्हाडी मंडळीला लग्नासाठी आग्रहाचं आमंत्रण दिलंय मात्र एक अट देखील समोर ठेवली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, लग्नाला येणाऱ्या सर्व पाहुण्यांना त्यांचा आरटी पीसीआर (RT-PCR) रिपोर्ट दाखवणं बंधनकारक केलं आहे. इतकंच नाही तर वधू-वराने आपल्या लग्नपत्रिकेत स्पष्टपणे लिहिले आहे, लग्नाला आवर्जून या, पण तुमचा आरटी पीसीआर रिपोर्ट सोबत आणा…

मिळालेल्या माहितीनुसार, विजय आणि वैशाली यांचा विवाह २४ एप्रिल रोजी जयपूर येथे होणार आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान, वर-वधू दोघांच्या कुटुंबीयांकडून सावधगिरी बाळगली जात आहेत. या विवाहाचे आंमत्रण डिजिटल स्वरूपात पाहुण्यांना देण्यात आले आहे. पत्रिकेत पाहुण्यांना अॅन्टिजेन टेस्ट नाही तर RT PCR टेस्टचा रिपोर्ट सोबत आणण्यास विनंती केली आहे. दोन्ही कुटुंबीयांकडून असे सांगण्यात आले आहे की, लग्नात कोणत्याही प्रकारची जोखीम घेतली जाऊ शकत नाही. कुटुंबीयांकडून असे सांगितले जात आहे की, २४ एप्रिल रोजी पार पडणाऱ्या लग्न सोहळ्यात पाहुण्यांनी तपासणी केली असेल तरच त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच लग्नाच्यावेळी मास्क आणि हात सॅनिटाईझर देण्याची व्यवस्था देखील असणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज्यात लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभाबाबत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली असून याआधी लग्न समारंभाकरता ५० जणांची उपस्थिती होती. मात्र, आता ५० नाही तर केवळ २५ जणांच्या उपस्थितीत लग्न उरकावे लागणार आहे. तसेच एखाद्या व्यक्तीच्या लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त लोक आढळले तर कारवाई करण्यात येईल. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन ही करावे लागणार आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. आज रात्री ८ वाजल्या पासून नवे नियम लागू करण्यात आले आहेत. यामध्ये लग्न समारंभाबाबत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -