घरदेश-विदेशते तुमची खिल्ली उडवतील; जयराम रमेश यांनी राहुल गांधींना दिला सल्ला, का ते वाचा

ते तुमची खिल्ली उडवतील; जयराम रमेश यांनी राहुल गांधींना दिला सल्ला, का ते वाचा

Subscribe

नवी दिल्लीः कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभेत सुरु असलेल्या गदारोळावर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्याच्यांकडून दुर्दैवाने मी खासदार आहे, असा उल्लेख झाला. ही चूक लक्षात येताच शेजारी बसलेल्या जयराम रमेश यांनी राहुल गांधी यांच्या कानात त्यांना चूक सुधारण्याचा सल्ला दिला. माईक सुरु असल्याने सर्वांनाच हा सल्ला स्पष्टपणे ऐकू गेला. त्यामुळे हा सल्ला सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

जयराम रमेश राहुल गांधींना म्हणाले, तुम्ही चुकून दुर्दैवाने मी खासदार आहे असे म्हणालात. यावरुन ते तुमची खिल्ली उडवू शकतात. हे एकल्यानंतर राहुल गांधी यांनी आपली चूक सुधारली. दुर्दैवाने मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. चार मत्र्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत, त्यांना मी संसदेत उत्तर देईन, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

- Advertisement -

राहुल गांधी यांना जयराम रमेश हे सल्ला देत असतानाचा व्हिडीओ काही मिनिटांतच व्हायरल झाला. त्यावर भाजप नेते शहजाद पुनावला यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली. जयराम जी ते खासदार आहेत, हेच आमच्यासाठी दुर्दैवी आहे. कोणी सांगितल्याशिवाय ते विधानही करु शकत नाहीत, याचे दुःख आहे. परदेशातील विधानासाठी त्यांना कोणी प्रशिक्षण दिले असेल याचेच आश्चर्य वाटते, असा टोला पूनावाला यांनी हाणला.

- Advertisement -

लोकसभेत राहुल गांधी यांना बोलू दिले जात नाही. त्यावर राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले, गेले तीन दिवस झाले मला लोकसभेत बोलू दिले जात नाही. मला माझे म्हणणे मांडू दिले जात नाही. मी पंतप्रधान मोदी व अदानी यांच्यातील संबंधांवर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळेच मला बोलू दिले जात नाही. पण मी बोलणार आहे. नक्कीच माझे मुद्दे लोकसभेत मांडणार आहे. खासदार म्हणून मी संसदेत माझे म्हणणे मांडणे योग्य ठरेल, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -