घरदेश-विदेशBreaking : जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी सज्जाद खानला दिल्लीतून अटक

Breaking : जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी सज्जाद खानला दिल्लीतून अटक

Subscribe

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी सज्जाद खान याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड मुद्दसीरचा तो जवळचा सहकारी असल्याचे सांगितले जात आहे. मुद्दस्सरचा खात्मा मागच्या महिन्यातच करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी लाल किल्ल्याच्या जवळून सज्जादला अटक केली.

पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड मुद्दस्सीर खान याच्यासोबत सज्जाद हा सातत्याने संपर्कात होता. ११ मार्च रोजी दक्षिण काश्मीरच्या ट्राल परिसरात भारतीय सुरक्षा दलाने मुद्दस्सीरचा खात्मा केला होता. सज्जाद अनेक दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर होता. दिल्लीच्या रस्त्यावर शाल विकण्याचे काम करत असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -