(Jaishankar in London) नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या लंडनदौऱ्यावर आहेत. येथील चॅथम हाऊस येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर जयशंकर गाडीकडे जात असल्याचे पाहून खलिस्तानी निदर्शकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यातील एकाने त्यांच्या गाडीसमोर येत त्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्नही केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तथापि, यासंदर्भात, इंग्लंड तसेच भारताकडून अधिकृतरीत्या कोणतेही निवेदन देण्यात आलेले नाही. (Khalistan supporters protest in front of Jaishankar’s car)
ब्रिटन आणि आयर्लंडच्या सहा दिवसांच्या दौऱ्यादरम्यान, परराष्ट्र मंत्री जयशंकर हे लंडनमधील चॅथम हाऊस थिंक टँकमध्ये भारताशी संबंधित एका चर्चासत्रात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी काश्मीरपासून ते रेसिप्रोकल टॅरिफ आणि ट्रम्प यांच्या धोरणांपर्यंतच्या विविध मुद्द्यांवर मोकळेपणाने भाष्य केले. पण या कार्यक्रमानंतर इमारतीतून बाहेर ते पडताच, तिथे असलेले खलिस्तान समर्थक झेंडे घेऊन घोषणाबाजी करू लागले. जयशंकर गाडीत बसले, तेवढ्यात एका खलिस्तानी समर्थक धावत त्यांच्या गाडीसमोर आला आणि त्याने जयशंकर यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. या समर्थकाने भारताच्या तिरंग्याचा अवमान केला. पण तेवढ्यात तिथे असलेल्या पोलिसांनी त्या खलिस्तान समर्थकाला तेथून दूर नेले.
Khalistani elements attempt to heckle India’s External Affairs Minister S Jaishankar while he was leaving in a car after attending an event in London, England.
The National flag of India was desecrated.
The Govt of India must revoke the PIO/OCI cards of anti-India elements. pic.twitter.com/ogNjVkIpB6
— Anshul Saxena (@AskAnshul) March 6, 2025
पाकिस्तानने भारताचा चोरलेला भाग (पीओके) आता परत येण्याची वाट पाहात आहे. तो भाग भारतात सामील होताच जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर्ण शांतता प्रस्थापित होईल, असे सांगत जयशंकर यांनी चॅथम हाऊस थिंक टँकमध्ये आयोजित कार्यक्रमात पाकिस्तानवर निशाणा साधला.
यूके दौऱ्यात परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर, परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांच्यासह इतर अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. मंगळवारी ब्रिटनच्या गृहसचिव यवेट कूपर यांच्यासमवेत बैठक झाली.
हेही वाचा – Rahul Gandhi : सावरकरांवरील ते विधान राहुल गांधींना भोवण्याची शक्यता, कोर्टाने दिले हे आदेश