जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालकांची हत्या; अमित शाहांच्या दौऱ्याआधी धक्कादायक घटना

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. तीन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्यासाठी अमित शाहा जम्मूत पोहोचले आहेत. मात्र शाहांच्या दौऱ्या पूर्वीच मोठी घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. तीन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्यासाठी अमित शाहा जम्मूत पोहोचले आहेत. मात्र शाहांच्या दौऱ्या पूर्वीच मोठी घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. जम्मू-काश्मीरचे कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची हत्या झाल्याचे समजते. (jammu and kashmir dg jail hemant lohia found dead in house servant suspected of killing)

मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत लोहिया यांचा मृतदेह घरात संशयास्पदरित्या आढळून आला आहे. हेमंत लोहिया यांची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे समजते. लोहिया याच्या हत्येची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपासाला सुरूवात झाली. याप्रकरणी अधिक चौकशी केली असता, लोहिया यांच्या हत्येनंतर त्यांचा नोकर बेपत्ता झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लोहिया यांची हत्या नोकराने केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, नोकराचा शोधही सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, हेमंत लोहिया यांची हत्या का आणि कोणी केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर पोलिस आणि प्रशासन सतर्क झाले आहेत. तसेच तीन दिवसीय दौऱ्यासाठी अमित शाह जम्मूत रात्री दाखल झाले. अमित शाह जम्मूत येत असतानाच ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली असून, सुरक्षेच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

दरम्यान, ऑगस्टमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या तुरुंग विभागाचे नवे पोलीस महासंचालक म्हणून भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी हेमंत लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली होती. लोहिया यांच्या घरात नुतनीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे ते जम्मूमध्ये त्यांचे मित्र राजीव खजुरिया यांच्या कुटुंबासोबत राहत होते. मित्राच्या घरी लोहिया यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत पडलेला आढळून आल्याचे सांगितले जात आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे घेणार जाहीर सभा, टेंभी नाक्यापासून होणार महाप्रबोधन यात्रेला सुरुवात