घरताज्या घडामोडीजम्मू काश्मीरच्या नौगाम सेक्टरमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरच्या नौगाम सेक्टरमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमध्ये एलओसी जवळ भारतीय सुरक्षा दलात आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. हे दहशतवादी एलओसीमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. पण हा घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. जवानांनी यांच्याकडून दोन एके-४७ आणि भरपूर प्रमाणात दारूगोळा जप्त केला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी जवानांना पहाटे नौगाम सेक्टरमध्ये संशयास्पद हालचाल दिसली. यामुळे या परिसरात कारवाई करण्यात आली. या महिन्यात आतापर्यंत भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी ६ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. याआधी पुलवामा जिल्ह्यातील गोसू भागात १ दहशतावाद्याला ठार केले होते. या चकमकीत भारताचा १ जवान शहीद झाला होता. तसेच ४ जुलै रोजी कुलगाम सेक्टरमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या दोन दहशतवाद्यांचा संबंध हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेशी होता. तसेच या दहशतवाद्यांच्या ओळख पटली होती. यापूर्वी श्रीनगरच्या मालबाग भागात २ जुलै रोजी १ दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता.


हेही वाचा – चीनला मोठा धक्का! १ मिनिटात फुटलं रॉकेट, २ उपग्रह ही झाले नष्ट!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -