दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक; २ अधिकाऱ्यांसह ३ जवान शहीद

कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार चकमक झाली असून या चकमकीत २ अधिकाऱ्यांसह ३ जवान शहीद झाले आहेत.

jammu and kashmir five jawans martyred including two army officers two terrorists killed
दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक; २ अधिकाऱ्यांसह ३ जवान शहीद

देशभरात कोरोना व्हायरसचे थैमान सुरू असताना शनिवारी रात्री कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन लष्करी अधिकाऱ्यांसोबत तीन जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. सुमारे आठ तास ही चकमक सुरु असल्याची माहिती एएआयने दिली आहे.

या चकमकीत झालेल्या शहीदांमध्ये २१ राष्ट्रीय रायफल्सच्या युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अशुतोष शर्मा यांचा समावेश आहे. शर्मा यांनी यापूर्वी अनेक यशस्वी काउंटर टेररिझम मोहिमांमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती.

गुप्तचर यंत्रणांनी दिली माहिती

कुपडावा जिल्ह्यातील हंदवाडा शहरातील चांगिमुला येथे काही स्थानिक नागरिकांना दहशतवादी बनवणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली. त्यानुसार, याठिकाणी लष्कर आणि जम्मू – काश्मीर पोलिसांची संयुक्त मोहिम राबवण्यात आली होती.

दरम्यान, हंदवाडा मोहिमेच्या प्रवक्त्त्यांनी सांगितले की, स्थानिक राहत असलेल्या भागात दहशतवादी घुसले आहेत. ही माहिती मिळताच लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी लष्कराचे पाच जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक जवान अशा सहा जणांची टीमने त्याठिकाणी रवाना झाली. त्यानंतर त्यांनी इथल्या नागरिकांना सुरक्षितरित्या घरातून बाहेरही काढले. दरम्यान, इथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांना जवानांची चाहूल लागत्याच त्यांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात सुरुवात केला. जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले आणि या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. मात्र, आपल्या दोन लष्करी अधिकाऱ्यांसह दोन जवान आणि एक जम्मू-काश्मीर पोलीसांचा सब इन्पेक्टर असे पाच जण शहीद झाले आहेत.


हेही वाचा – दोनदा प्लाझ्मा डोनेट केलाय, गरज पडली तर १० वेळा करेन – तबलिगी