घरदेश-विदेश'पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करू शकत नाही.'

‘पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करू शकत नाही.’

Subscribe

जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय आहे, त्यामुळे पाकिस्ताने यामध्ये हस्तक्षेप करू नये, असं राहुल गांधी यांनी टि्वटच्या माध्यमातून सांगितलं आहे.

भारत सरकारने जम्मू-काश्मीरला विशेषधिकार देणारा कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान खवळला आहे. या निर्णयानंतर पाकिस्तान भारताविरोधात अनेक निर्णय घेत आहे. याप्रकरणावर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील वक्तव्य केलं आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. यात पाकिस्तानला हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असं म्हणतं त्यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानकडून दाखल करण्यात याचिकेवर प्रतिक्रिया देताना टि्वटरच्या माध्यमातून पाकिस्तावर टीका केली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये असं लिहिल आहे की, ‘मी आताच्या सरकाराने घेतलेल्या अनेक निर्णयावर असहमत आहे. परंतु काश्मीर हा भारताचा मुद्दा आहे, हे मी स्पष्ट करत आहे. तसेच जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात पाकिस्तान किंवा कोणत्याही अन्य देशाने हस्तक्षेप करू नये.’

- Advertisement -

तसेच राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरमधील जो हिंसाचार पसरत आहे त्याला पाकिस्तानचे समर्थन आहे असा आरोप केला आहे. पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालतं असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

भारताने घेतलेल्या या ऐतिहासितक निर्णयानंतर पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लघंन केले जात आहे. याबाबत काँग्रेसनेही जोरदार विरोध केला आहे. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. दुसरीकडे आज केंद्रीय कॅबिनेटची विशेष बैठक होणार आहे. या बैठकीत जम्मू-काश्मीरसाठी मोठी घोषणा करण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती शासन सुरू आहे. केंद्र सरकारवर त्यासाठी अधिनियम लागू करण्याची जबाबदारी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -