घरदेश-विदेशजम्मू आणि काश्मीर हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान, रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

जम्मू आणि काश्मीर हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान, रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

Subscribe

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. आपल्याला सर्वांना मिळून जम्मू-काश्मीरला नव्या शिखरावर घेऊन जायचे आहे. 2047च्या विकसित भारताचे मोठे उद्दिष्टही आपल्याकडे आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला दृढ निश्चयाने राष्ट्र उभारणीत सहभागी व्हावे लागेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, रविवारी केले.

- Advertisement -

जम्मू -काश्मीर येथे झालेल्या रोजगार मेळाव्याला पंतप्रधान मोदी यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संबोधित केले. सरकारमध्ये काम करण्यासाठी नियुक्तीपत्र मिळालेल्या तीन हजार तरुणांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. या तरुणांना सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग,अन्न आणि नागरी पुरवठा विभाग, पशुसंवर्धन, जलशक्ती, शिक्षण-संस्कृती अशा विविध विभागांमध्ये सेवा करण्याची संधी मिळणार आहे. तसेच येत्या काही दिवसांत विविध विभागांमधील 700हून अधिक नियुक्तीपत्रे देण्याची तयारी जोरात सुरू असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.

आता जुनी आव्हाने मागे टाकण्याची आणि नवीन शक्यतांचा पुरेपूर लाभ घेण्याची वेळ आली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील तरुण त्यांच्या राज्याच्या आणि लोकांच्या विकासासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहेत,यांचा मला आनंद आहे. आमचे जम्मू आणि काश्मीरमधील तरुणच विकासाची नवीन गाथा लिहिणार आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले. 2019पासून सुमारे 30 हजार सरकारी पदांसाठी भरती करण्यात आली असून, त्यापैकी 20 हजार नोकऱ्या गेल्या दीड वर्षात देण्यात आली. ‘योग्यतेद्वारे रोजगार’ हा मंत्र राज्यातील तरुणाईमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करत आहे, असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटकांच्या संख्येत झालेल्या विक्रमी वाढीवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी म्हणाले की, पायाभूत सुविधांच्या विकासामुळे आणि वाढत्या कनेक्टिव्हिटीमुळे राज्यातील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. कोणताही भेदभाव न करता सरकारी योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा प्रयत्न आहे. विकासाचे समान लाभ सर्व घटक आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये आरोग्य आणि शिक्षणाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून 2 नवीन एम्स, 7 नवीन वैद्यकीय महाविद्यालये, 2 राज्य कर्करोग संस्था आणि 15 परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालये सुरू केल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -