घरताज्या घडामोडीजम्मू-काश्मीरमध्ये निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळून 10 जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळून 10 जणांचा मृत्यू

Subscribe

निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळून 10 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जम्मू-काश्मीरमध्ये घडली. बोगद्याचा भाग कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, आणखी काहीजण अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळून 10 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) घडली. बोगद्याचा भाग कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, आणखी काहीजण अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना गुरूवारी रात्री उशीरा घडली असून दोन दिवस उलटून गेले तरी अद्याप बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मिळते.

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन चौपदरी बोगद्यावरील डोंगर कोसळल्याच्या (under construction tunnel collapsed) घटनेनंतर पोलीस आणि लष्कराने तातडीने संयुक्त बचाव मोहीमेला सुरूवात केली. सुरूवातीला दोन जणांना वाचवण्यात यश आले. त्यावेळी रामबनचे उपायुक्त, प्रकल्प संचालक, डीआयजी आणि एसएसपी उपस्थित होते.

- Advertisement -

या बचाव कार्यात इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) सहभागी आहेत. 15 व्या बटालियन ITBP चे जवान एका स्निफर डॉगसह बचाव कार्यात सहभागी आहेत. दरम्यान, बाहेर काढण्यात आलेल्या 10 मृतांपैकी पाच जण पश्चिम बंगाल, एक आसाम, दोन नेपाळ तर दोघे स्थानिक आहेत, अशी माहिती मिळते. तसेच हे बचाव कार्य पूर्ण झाल्याचे त्यांनी दिली आहे. घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व कामगारांच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या दुर्घटनेत बुलडोझर आणि ट्रकसह अनेक मशीनचेही नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, या घटनेतील जखमींना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी आणि त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवता यावे, यासाठी रुग्णवाहिका घटनास्थळी मागवण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Rajiv Gandhi: तर राजीव गांधींवर श्रीपेरुंबदुरमध्ये नाही दिल्लीत हल्ला झाला असता, LTTEचा प्लॅन बी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -