Eco friendly bappa Competition
घर क्राइम दहशतवाद्यांकडून हिंदूंचे टार्गेट किंलिग सुरूच; 2 भावांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

दहशतवाद्यांकडून हिंदूंचे टार्गेट किंलिग सुरूच; 2 भावांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

Subscribe

शोपियांच्या छोटीपुरा परिसरात असलेल्या सफरचंदाच्या बागेत एका नागरिकावर दहशतवाद्यांनी गोळाबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.

शोपियांच्या छोटीपुरा परिसरात असलेल्या सफरचंदाच्या बागेत एका नागरिकावर दहशतवाद्यांनी गोळाबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. दहशतवाद्यांनी गोळाबार केलेले दोन्ही व्यक्ती हे हिंदू असल्याचे समजते. त्यामुळे पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून हिंदूंचे टार्गेट किंलिग कायम सुरू आहे. (jammu and Kashmir Kashmiri pandit shot dead another injured)

दहशतवाद्यांन गोळीबार केलेले दोघेही काश्मीरी पंडित (Kashmiri Pandit) असून दोघेही सख्खे भाऊ आहे. सुनील कुमार भट्ट असे मृत व्यक्तीचे नाव आहे, तर पिंटू कुमार भट्ट असे जखमी व्यक्तीचे नाव असल्याचे समजते. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या या गोळीबारानंतर स्थानिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या महितीनुसार, सुनील भट्ट आणि त्यांचा भाऊ पिंटू भट्ट हे दोघेही सफरचंदाच्या बगीच्यामध्ये जात होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांना त्यांचे नाव विचारले. या दोघांनी आपले नाव सांगताच अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. शोपियाच्या छोटेपोरा येथे दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणल्याचे समजते. या हल्ल्यानंतर पिंटू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या हल्ल्याचा भाजप नेते निर्मल सिंह यांनी निषेध नोंदवला आहे. तसेच, “सुनील कुमार त्याचे काम करत होता, तरीही अतिरेक्यांनी त्याला ठार केले. अतिरेक्यांनी कितीही प्रयत्न करावेत परंतु, ते दहशत निर्माण करण्यात कदापी यशस्वी होणार नाही”, असेही निर्मल सिंह यांनी म्हटले.

- Advertisement -

स्वातंत्र्य दिनादिवशीच जम्मू-काश्मीरमधील बडगाम आणि श्रीनगरमध्ये दोन ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक नागरिक आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दोन्ही हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा वापर केला होता. बडगाममधील गोपालपुरा चंदूरा परिसरात करण कुमार सिंह नावाचा व्यक्ती जखमी झाला. या परिसरात सुरक्षा दलाने शोधमोहिम राबवली, मात्र दहशतवादी हाताला लागले नाहीत. सिंह यांना श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


हेही वाचा – धनुष्यबाण कोणाच्या हाती? निवडणूक आयोगाच्या आधी सुप्रीम कोर्ट देणार निर्णय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -