घरताज्या घडामोडीशोपियांमध्ये चकमक सुरू; चार दहशतवादी ठार!

शोपियांमध्ये चकमक सुरू; चार दहशतवादी ठार!

Subscribe

जम्मू – काश्मिरच्या शोपियांमध्ये जवानांबरोबर झालेल्या चकमकीत ४ दहशतवादी ठार झाले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आताही त्या ठिकाणी काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता आहे. सध्या त्या दहशतवादी शोध सुरू आहे. इंडियन आर्मीच्या चिनार कोर कडून ही माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही चकमक शोपियाच्या जैनापोरा गावात मंगळवारी रात्री सुरू झाली. पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मेलहोरा परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळताच त्या परिसराला चारी बाजूने घेरण्यात आलं. या अभियानात जम्मू- काश्मीरचे पोलिस, ५५ राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफचे जवानांची तुकडी हे सर्च ऑपरेशन चालवत होते.

- Advertisement -

या अभियानादरम्यान दहशतवादी जवानांवर गोळ्या चालवायला सुरूवात केली. त्यानंतर जवान आणि आतंकवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. यामध्ये २ आंतकवादियांना मारण्यात यश आलं. त्यानंतर आणखी काही वेळाने आणखी दोन आंतकवादियांना कंठस्नान घालण्यात आलं. अजूनही चकमक मूठभेडमध्ये सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -