Jammu & Kashmir : वाढत्या दहशतवादी हल्ल्यांमुळे काश्मिरी पंडितांची पलायनाची घोषणा

जम्मू-काश्मीममध्ये (Jammu & Kashmir) मागील काही दिवसापासून सर्वसामन्यांवर होणारे हल्ले (Firing) थांबण्याचे नाव घेत नाही आहे. मागील दोन-चार दिवसांपासून सतत दहशतवाद्यांकडून (Terrorist) गोळीबार केला जात आहे.

जम्मू-काश्मीममध्ये (Jammu & Kashmir) मागील काही दिवसापासून सर्वसामन्यांवर होणारे हल्ले (Firing) थांबण्याचे नाव घेत नाही आहे. मागील दोन-चार दिवसांपासून सतत दहशतवाद्यांकडून (Terrorist) गोळीबार केला जात आहे. परिणामी काश्मीरमध्ये सतत टार्गेट किलिंगच्या घटना घडत असल्याने याठिकाणी राहणाऱ्या काश्मिरी पंडितांनी पलायन करण्याची घोषणा केली आहे.

दहशतवाद्यांकडून सततच्या होणाऱ्या हल्ल्यांमुळे आज कश्मीरी पंडित खोऱ्यातून एकत्र पलायन करणार आहेत. दरम्यान, काश्मीरमधील अनंतनाग येथील सुरक्षा शिबिरात राहणारे काश्मीरी पंडित मागील २२ दिवसांपासून सुरक्षेसाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून सुखरूप बाहेर काढण्याची मागणी हे काश्मीरी पंडित करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर या अनंतनाग येथील सुरक्षा शिबिरात आंदोलक रंजन झुत्शी यांनी सांगितले की, “जसे आम्ही १९९० मध्ये स्थलांतरित झालो होतो, त्याप्रकारे आताही जावे लागत आहे. सुमारे ३००० कर्मचारी आधीच जम्मूमध्ये पोहोचले आहेत.”, असे त्यांनी सांगितले.

उच्चस्तरीय बैठक

गृहमंत्री अमित शाह आज नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. दुपारी होणाऱ्या या बैठकीत एनएसए डोभालही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कुलदीप सिंग आणि सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख पंकज सिंग हेही या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.

काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गैर-काश्मिरी किंवा हिंदू नागरिकांची निवडक हत्या केली जात आहे. मागील महिन्यात अशा तीन घटना घडल्या होत्या. त्यामुळे तेथील अल्पसंख्याकांची चिंता वाढली होती.

2 जून रोजी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात बँक व्यवस्थापक विजय कुमार यांचा मृत्यू झाला. तो राजस्थानमधील हनुमानगडचा रहिवासी होता. विजय कुमार हे कुलगाममधील मोहनपोरा येथील देहाती बँकेत तैनात होते. दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली आहे. विजय कुमारच्या वडिलांनी सांगितले की ते बदलीसाठी बँक पीओ तयार करत होते, जेणेकरून ते पास होऊन शाखा व्यवस्थापक बनू शकतील, परंतु देवाला काही वेगळेच मंजूर होते.

31 मे रोजी कुलगाममध्ये महिला शिक्षिका रजनीबाला यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. ती सांबा येथील रहिवासी होती. कुलगाममधील गोपालपोरा येथे त्यांची हत्या करण्यात आली होती. रजनी या गोपाळपोरा हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. गोळीबारानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

12 मे रोजी जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये दहशतवाद्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या. तहसील कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी राहुल भट्ट नावाच्या अधिकाऱ्याला लक्ष्य केले. रुग्णालयात उपचारादरम्यान राहुलचा मृत्यू झाला. काश्मिरी पंडित राहुल बराच काळ महसूल विभागात कार्यरत होते.


हेही वाचा – काँग्रेसमध्ये नव्या नियमाप्रमाणे ५१ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, नाना पटोलेंची माहिती