Srinagar Terrorist Attack: श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या बसवर दहशतवादी हल्ला: दोन जवान शहीद, १४ जवान जखमी

jammu and kashmir terrorists attack armed police bus 2 policemen death and 14 policemen injured
Srinagar Terrorist Attack: श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या बसवर दहशतवादी हल्ला: १४ जवान जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या पंथचौकात आज संध्याकाळी सुरक्षा दलाच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवादी गोळीबारमध्ये १४ जवान जखमी झाले असून दोन जवान शहीद झाल्याचे सांगितले जात आहे. जम्मू-काश्मीरच्या ९व्या बटालियन सशस्त्र पोलीस बसवर हा हल्ला झाला. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सुरक्षा दलाने संपूर्ण परिसर घेरून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी काश्मीर टायगर्स संघटनेने घेतली आहे.

यापूर्वी आजच श्रीनगरच्या रंगरेथ भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने २ दहशतवाद्यांना ठार केले होते. दरम्यान सुरक्षा दलाला माहित मिळाली होती की, श्रीनगरच्या रंगरेथमध्ये दहशतवाद्यांची हालचाल सुरू होती. त्यानंतर या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले गेले. मग दहशतवाद्यांना आपल्याला घेरले असल्याचे समजल्यानंतर सुरक्षा दलावर त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

काल, रविवारी देखील जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्याच्या अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलात आणि दहशतावाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला ठार केले. हा ठार केलेल्या दहशतवाद्याची ओळख पटली आहे. समीर अहमद असे या दहशतवाद्याचे नाव असून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेसोबत त्याचे संबंध होते.

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीचे सत्र सुरू आहे. शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मोहम्मह सुलतान आणि फयाज अहमद नावाचे दोन पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते, पण त्यांनी तिथेच अखेरचा श्वास घेतला.


हेही वाचा – दहशतवाद्यांनी संसदेवर १३ डिसेंबरलाच का केला होता हल्ला?