मोठे यश; लश्करचा कमांडर सैफुल्लाहसह दहशतवादी इर्शादचा खात्मा

Pakistan initiated unprovoked ceasefire violation along the loc
भारतीय सैन्याचे पाकला चोख उत्तर, ७-८ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा बंकर्स,लाँच पॅडही केले उदध्वस्त

जम्मू – काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत भारतीय जवानांना मोठे यश आले आहे. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा टॉप कंमांडर सैफुल्लाह याचा खात्मा करण्यात आला असून सैफुल्लाह हा पाकिस्तानी नागरिक असल्याचे समजते. तर चकमकीत मारला गेलेला दुसरा दहशतवादी इर्शाद हा असून तो पुलवाम्याचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीर पोलीस तसेच सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाला या भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दहशतवाद्यांचा शोध सुरू झाला. हे संयुक्त पथक दहशतवादी लपलेल्या भागात पोहोचताक्षणी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिले.

पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी माहिती देताना सांगितले की, पाकिस्तानचा दहशतवादी असलेला सैफुल्लाह याच्यासोबत लश्कर-ए-तोयबाशी संबंधित एक स्थानिक दहशतवाद्याला घेरण्यात आले होते. सैफुल्लाह सप्टेंबरमधील आणि नुकत्याच झालेल्या नौगाम येथील सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. यात दोन जवान शहीद झाले होते.

काय आहे घटना 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफुल्लाह सीआरपीएफला निशाणा बनवत असे. नौगाम, चंडूरा, पंपोरमध्ये सीआरपीएफवर झालेल्या हल्ल्यात सैफुल्लाहचा सहभाग होता. या वर्षी दहशतवाद्यांच्या विरुद्ध एकूण ७५ मोहिमा हाती घेण्यात आल्या. त्यांमध्ये १८० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. श्रीनगर जिल्ह्यात आता केवळ एकच दहशतवादी सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे. खरे तर, सुरक्षादलांना परिसरात दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली.

हेही वाचा –

थंडीत चिंता वाढणार; Coronavirus २० डिग्री तापमानात मोबाईलवर २८ दिवस जिवंत राहतो