Homeदेश-विदेशJammu and Kashmir Weather : काश्मीरात 50 वर्षानंतर हाडं गोठवणारी थंडी, दल...

Jammu and Kashmir Weather : काश्मीरात 50 वर्षानंतर हाडं गोठवणारी थंडी, दल सरोवराचा पृष्ठभागही गोठला

Subscribe

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच दशकांतील ही या मोसमातील शनिवारची रात्र ही सर्वात थंड रात्र होती. यावेळी काश्मीरातील तापमान उणे 8.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरात पर्यटक हे तिथल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तर जातातच. परंतु, काश्मीरातील थंडीचा अनुभव घेण्यासाची हौसही अनेक पर्यटकांना असते. हिवाळा या ऋतुमध्ये काश्मीरात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. परंतु असे असतानाच आता काश्मीरात 50 वर्षांनंतर हाडं गोठवणारी थंडी पडली आहे. काश्मीरात ‘चिल्लई कलान’ नावाचा हा 40 दिवसांचा थंडीचा प्रवास शनिवारपासून (ता. 21 डिसेंबर) सुरू झाला आहे. (Jammu and Kashmir Weather Freezing cold after 50 years in Kashmir, surface of Dal lake also freezes)

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच दशकांतील ही या मोसमातील शनिवारची रात्र ही सर्वात थंड रात्र होती. यावेळी काश्मीरातील तापमान उणे 8.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले. तर, रविवारी सकाळीही थंडीचा प्रभाव कायम राहिला आणि श्रीनगरमध्ये पारा उणे 3.2 अंश सेल्सिअस नोंदवला गेला. थंडीची तीव्रता इतकी आहे की दल सरोवराचा पृष्ठभागही गोठला आहे. याशिवाय दिल्ली आणि राजस्थानमध्येही थंडीच्या लाटेचा प्रभाव दिसून आला. डिसेंबर 1974 नंतरची ही श्रीनगरची सर्वात थंड रात्र होती. 1974 मध्ये काश्मीरात किमान तापमान उणे 10.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते.

हेही वाचा… Weather Update : नागरिकांनो काळजी घ्या, IMD कडून हवामान बदलाचा इशारा

याशिवाय, 1891 नंतर ही तिसरी सर्वात थंड रात्र होती. श्रीनगरमधील सर्वात जास्त थंडी 13 डिसेंबर 1934 रोजी होती. जेव्हा तापमान उणे 12.8 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. यंदाच्या हिवाळ्यातील ‘चिल्लई कलान’ हा 31 जानेवारी 2025 रोजी संपणार आहे. मात्र, त्यानंतरही खोऱ्यात थंडीची लाट कायम राहणार आहे. कारण 20 दिवस चिल्लई खुर्द (लहान थंडी) आणि 10 दिवस चिल्लई-बच्छा (बाळांची थंडी) 40 दिवसांनी सुरू होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. काश्मीरातील थंडीचा परिणाम दिल्लीतही पाहायला मिळाला. कारण रविवारी सकाळी दिल्लीवर धुक्याची चादर पसरल्याचे पाहायला मिळाले. तर, दिल्लीचे किमान तापमान 8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

दिल्लीशिवाय राजस्थानातही थंडीची लाट पसरली असून रविवारी करौली येथे सर्वात कमी तापमान म्हणजेच 4.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. याबाबत भारतीय हवामान विभागाने माहिती देत सांगितले की, राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहिले, तर काही ठिकाणी धुके दिसून आले. करौलीनंतर संगरियामध्ये 5.3 अंश सेल्सिअस, फतेहपूरमध्ये 5.4 अंश, चुरू आणि अलवरमध्ये 6.6 अंश, श्रीगंगानगरमध्ये 7 अंश, ढोलपूरमध्ये 7.5 अंश आणि अंताहमध्ये 7.8 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले आहे.


Edited By Poonam Khadtale