Weather Update: ‘या’ राज्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

imd Weather Alert for maharashtra including mumbai pune rains expected in next 12 hrs march cyclone

दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात काल, शनिवारी जोरदार वारे वाहत होते, ज्यामुळे किमान तापमान १४ अंशांपर्यंत पोहोचले होते. हवामान विभागाच्या (Indian Metrological Department) माहितीनुसार, नैऋत्य बंगालच्या उपसागरातील खोल दाबाचे क्षेत्र (Deep Depression) कमजोर पडले आहे. त्यामुळे दिल्ली आणि वायव्य भारतात वाऱ्याचा वेग कमी झाला आहे. परंतु खोल दाबाचे क्षेत्र आता बंगाल उपसागरातून पुढे नैऋत्य दिशेला उत्तर तामिळनाडूच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. या कारणामुळे पुढील दोन दिवस तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, आंध्र प्रदेश आणि रायलसीमा येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. २४ तासांनंतर हे खोल दाबाचे क्षेत्र हळूहळू कमी दाबाच्या क्षेत्रात कमकुवत होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातील हवामान साफ असण्याची शक्यता आहे. हवामान गुणवत्ताही मध्यम म्हणजे १३८च्या आसपास असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नैऋत्य आणि लगतच्य पश्चिम-मध्य बंगालचा उपसागर, मन्नाचा उपसागर आणि उत्तर तामिळनाडूसोबत पुद्दुचेरी, दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीवर ४५-५५ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील. त्यानंतर ७ मार्चपासून ते हळूहळू कमी होतील.

पुढील दोन दिवस डोंगराळ भागात बर्फवृष्टी

हवामान विभागानुसार, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील उंचावरील भागात पुढील दोन दिवस बर्फवृष्टीचा यलो अलर्ट जारी केला आहे. ६ आणि ७ मार्चला जम्मू काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये हलका, मध्य पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. दरम्यान जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमधील लोकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. शुक्रवारी अटल टनलच्या उत्तर पोर्टलजवळ हिमस्खलन झाले. त्यामुळे बर्फ बाजूला घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावली लागली. अजूनही हिमाचल प्रदेशमध्ये १३८ रस्त्यांवरील वाहतूक ठप्प आहे. ३ जानेवारीपासून बंद असलेला महामार्ग कुल्लूच्या लोकांसाठी ही एक समस्या झाली आहे. दरम्यान ८ मार्चपासून बर्फवृष्टीत कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रातील हवामानाची परिस्थिती

राज्यात उद्यापासून ९ मार्चपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकणात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे.


हेही वाचा – Weather Update : अस्मानी संकट! 7 मार्चपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता – IMD