घरताज्या घडामोडीकाश्मीर: बारामुला येथे सैन्याच्या पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवादी हल्ला, एक जवान जखमी

काश्मीर: बारामुला येथे सैन्याच्या पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवादी हल्ला, एक जवान जखमी

Subscribe

जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवादी हल्ला झाला आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील हायगम भागात संशयित दहशतवाद्यांनी गस्त घालत असलेल्या जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात सैन्यातील एका सैनिकाला दुखापत झाली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी हायगममधील टाईमपास हॉटेल जवळ सीआरपीएफच्या जवानांवर आणि पोलिसांवर गोळीबार केला. सुरक्षा दलाने पलटवार केला परंतु दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक सैनिक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं. सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला वेढा घातला असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

- Advertisement -

आज झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार

आज पुलवामा जिल्ह्यातील कामराजीपोरा येथे सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं आहे. दोन दहशतवादी कामराजीपोराच्या सफरचंदाच्या बागेत लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानंतरच्या कारवाईत एक अतिरेकी ठार झाला, तर एक सैनिकही शहीद झाला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -