जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात मोठी कारवाई; बिट्टा कराटेच्या पत्नी, सलाहुद्दीन मुलासह चार कर्मचारी बडतर्फ

सुत्रांच्या माहितीनुसार, असबाहने कामावर गैरहजर असताना जर्मनी, यूके, हेलसिंकी, श्रीलंका आणि थायलंडला प्रवास केला होता.

jammu kashmir ig manoj sinha massive crackdown on terror ecosystem four govt employees dismissed for terror links

जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गर्व्हनर मनो ज सिन्हा यांनी दहशतवादाविरोधात मोठी कारवाई केली आहे. बिट्टा कराटे यांच्या पत्नी सय्यद सलाहुद्दीनच्या मुलासह चार सरकारी कर्मचाऱ्यांना दहशतवादी परिसंस्थेत सामील झाल्याने बडतर्फ केले आहे. तसेच त्यांच्याकडून सर्व सरकारी केवा काढून घेतल्या आहेत.

त्याचवेळी उपराज्यपालांच्या कारवाईनंतर भाजपचे एक वक्तव्य समोर आले आहे. ज्यात जम्मू-काश्मीरमध्ये भाजप अध्यक्ष रवींद्र रैना म्हणाले की ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवादी संघटनांच्या नेत्यांवर आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्यांवर जोरदार प्रहार केला आहे.

जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) प्रमुख अतिरेकी फारुख अहमद दार उर्फ ​बिट्टा कराटे याची पत्नी असबाह आरजूमंद खान 2011 च्या बॅचची JKAS अधिकारी आहे. याशिवाय मुहित अहमद भट यांची काश्मीर विद्यापीठात वैज्ञानिक-डी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. माजिद हुसैन कादरी काश्मीर विद्यापीठात वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक आणि सय्यद सलाहुद्दीन यांचा मुलगा सय्यद अब्दुल मुईद आयटी, जेकेईडीआयमध्ये व्यवस्थापक होता. घटनेतील कलम 311 लागू करून या सर्वांना काढून टाकण्यात आले आहे.

कारवाई करण्यात आलेल्यामध्ये वरच्या स्थानी बिट्टा कराटे यांची पत्नी असबाह हिचे नाव आहे. बिट्टाचे आयएसआयसह अनेक दहशतवादी संघटनांशी जवळचे संबंध आहेत तसेच तो कट्टर फुटीरतावादी नेताही आहे. कराटेच्या ट्रायलदरम्यान पत्नी असबाह प्रसिद्धीच्या झोतात आली. असबाहला 2003 मध्ये शेर-ए-काश्मीर युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी- काश्मीरमध्ये नोकरी मिळाली. मात्र तिची नियुक्ती मागच्या दारातून झाल्याचा आरोप केला जात आहे. 2003 ते 2007 या कालावधीत ती ड्युटीवर हजर राहिली नाही, तसेच महिनोनमहिने गैरहजर राहिले, मात्र तिच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचेही कळते. अखेर ऑगस्ट 2007 मध्ये असबाह यांना पदावरून हटवण्यात आले.

सुत्रांच्या माहितीनुसार, असबाहने कामावर गैरहजर असताना जर्मनी, यूके, हेलसिंकी, श्रीलंका आणि थायलंडला प्रवास केला होता. जेकेएलएफसाठी रोख रक्कम गोळा करण्यात तिचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. तिने बहुतेक नेपाळ आणि बांगलादेशात रस्त्ये मार्गे प्रवास केला. असबाहने 2011 मध्ये JKAS परीक्षा उत्तीर्ण केली आणि काही महिन्यांतच बिट्टा कराटेशी लग्न केले.


मध्य प्रदेशात कारम नदीवर बांधले जात असलेले धरण फुटण्याच्या मार्गावर, गावांचं स्थलांतरण