Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी जम्मू-काश्मीरमध्ये हिमस्खलनात तीन जवानांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये हिमस्खलनात तीन जवानांचा मृत्यू

Subscribe

जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तीन जवानांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुपवाडा जिल्ह्यातील माच्छिल सेक्टरमधील हिमस्खलनात शुक्रवारी ही घटना घडली.

जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तीन जवानांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुपवाडा जिल्ह्यातील माच्छिल सेक्टरमधील हिमस्खलनात शुक्रवारी ही घटना घडली. गनर सौविक हजरा (२२), लांस नायक मुकेश कुमार (२२), नायक मनोज लक्ष्मण राव गायकवाड (४५) अशी या जवानांची नावे आहेत. (jammu kashmir Indian Army 3 Soldier Died Near Loc)

पोलिसांच्या माहितीनुसार, तिन्ही जवान हे माच्छिल सेक्टरमध्ये कर्तव्यावर होते. अचानक झालेल्या हिमस्खलनात तिन्ही जवानांच्या अंगावर बर्फाचा थर कोसळला. यामध्ये तिन्ही जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलाच्या पथकाने बचाव कार्य सुरू केले. त्यांनी तिन्ही जवानांचे बर्फातून बाहेर काढले, त्याआधीच तिन्ही जवानांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

दरम्यान, गस्तीवर असताना या सैनिकांच्या अंगावर बर्फाचा थर कोसळला. बर्फात अडकलेल्या 2 सैनिकांची सुटका करून त्यांना कुपवाडा येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र तिघांचाही बचाव करण्यात अपयश आल्याचं संरक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे.


हेही वाचा – मच्छर जरी चावला तरी मुख्यमंत्र्यांनी पाठवला असे म्हणणारे.., शिंदे गटाचा ठाकरे गटाला टोला

- Advertisement -
- Advertisement -
Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -