Tral Encounter: सुरक्षा दलाला मोठे यश; जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरला केले ठार

Jammu kashmir jaish e mohammed commander sham sofi was killed in tral encounter
Tral Encounter: सुरक्षा दलाला मोठे यश; जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरला केले ठार

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आज जम्मू-काश्मीरच्या त्राल येथील एन्काउंटमध्ये दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर शाम सोफीचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. याबाबतची माहिती आयजीपी कश्मीर विजय कुमार यांनी दिली आहे. यापूर्वी पोलिसांनी सांगितले की, अवंतीपोराच्या त्राल भागात तिलवानी मोहल्ल्यात चकमक सुरू झाली. पोलीस आणि सुरक्षा दलाचे इथे ऑपरेशन सुरू आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये सुरक्षा दलाने पाच दहशतवाद्यांना ठार केले. शोपियांमध्ये सोमवार आणि मंगळवारी सुरक्षा दलाने ऑपरेशनमध्ये पाच दहशतवाद्यांना मारले. शोपियां जिल्ह्याच्या तुलरान आणि फेरीपोरा भागात झालेल्या या ऑपरेशनमध्ये सीआरपीएफची १७८ बटालियन, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचा समावेश होता.

शोपियांमध्ये एक चकमक तुलरान भागात झाले, त्यामध्ये भारतीय लष्कराने टीआरएफ संघटनाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामध्ये एका दहशतवाद्यांची ओळख पटली असून मुख्तार शहा असे त्याचे नाव आहे. तो गांदरबल येथे राहणारा होता आणि श्रीनगरमधील रस्ते विक्रेता वीरेंद पासवान यांच्या हत्यात सामील होता. हल्लानंतर दहशतवादी पळून शोपियांमध्ये आला होता. दुसरा एन्काउंटर शोपियांच्या फेरीपोरा भागात झाला. येथे दोन दहशतवाद्यांना मारले गेले. गेल्या ३६ तासांत सुरक्षा दलाने ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.


हेही वाचा – दहशतवादी अशरफचा मोठा खुलासा; घातपातासाठी इंडिया गेट, लाल किल्लासह १० ठिकाणांची केली रेकी