भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभात ‘हे’ पक्ष सामील होणार; एकूण २१ पक्षांना आमंत्रण

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा समारोप होत आहे. या सोहळ्यासाठी एकूण २१ पक्षांना निमंत्रित करण्यात आले होते, मात्र त्यातील काही पक्ष यात्रेच्या समारोप समारंभासाठी येणार नाहीत. काँग्रेसच्या या प्रवासात कोणकोणते पक्ष सहभागी होणार आहेत...जाणून घेऊयात....

bharat jodo yatra suspended for today as congress alleges security breach
काँग्रेसच्या या प्रवासात कोणकोणते पक्ष सहभागी होणार आहेत...जाणून घेऊयात....

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा समारोप होत आहे. या सोहळ्यासाठी एकूण २१ पक्षांना निमंत्रित करण्यात आले होते, मात्र त्यातील काही पक्ष यात्रेच्या समारोप समारंभासाठी येणार नाहीत. काँग्रेसच्या या प्रवासात कोणकोणते पक्ष सहभागी होणार आहेत ते जाणून घेऊयात….

भारत जोडो यात्रेच्या समारोपासाठी काश्मीरमध्ये मोठा मंच तयार केला जात आहे. दरम्यान, समारोप समारंभाला किमान १२ समविचारी विरोधी पक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २१ पक्षांना आमंत्रित केले होते, परंतु काहींनी सुरक्षेच्या कारणास्तव उपस्थित राहण्यास नकार दिला, असं सांगण्यात येत आहे. एकूण ९ पक्ष या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार नाहीत. यात तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि टीडीपी यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे काँग्रेस अस्वस्थ आहे.

एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके), शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी), तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), नितीश कुमार यांचा जनता दल (युनायटेड), उद्धव ठाकरेंचा शिवसेना, सीपीआय(एम), सीपीआय विदुथलाई चिरुथाईगल काची (व्हीसीके), केरळ काँग्रेस, फारूक अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, मेहबुबा मुफ्ती यांचा जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि शिबू सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) श्रीनगरमधील या समारोप सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांनीही शनिवारी भाऊ राहुल गांधी यांच्यासोबत या यात्रेत सहभाग घेतला. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख मेहबूबा मुफ्तीही अवंतीपोरा येथील यात्रेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी काँग्रेसकडून पुरेशी सुरक्षा पुरवली जात नसल्याचा आरोपही करण्यात आला. मात्र, स्थानिक पोलिसांनी यात्रेदरम्यान सुरक्षेतील त्रुटी नाकारल्या. आरोप फेटाळून लावताना या भागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) विजय कुमार म्हणाले की, “ऑपरेशनदरम्यान सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती.”

यात्रेच्या समारोपाला अनेक नेते उपस्थित राहणार

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या २७ जानेवारीच्या “सुरक्षेतील त्रुटी” संदर्भात जम्मू-काश्मीरमधील भारत जोडो यात्रेसाठी पुरेशी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वैयक्तिक हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “आम्ही येत्या दोन दिवसांत श्रीनगरमध्ये ३० जानेवारीला होणाऱ्या यात्रेला आणि उत्सवाला उपस्थित राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक जमण्याची अपेक्षा करीत आहोत. या दिवशी होणाऱ्या समारोप सोहळ्यात काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते आणि इतर महत्त्वाच्या राजकीय पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत.