घर देश-विदेश Jammu Kashmir: दडून बसलेल्या दहशतवाद्यांची आता खैर नाही; कोब्रा कमांडो शिकवणार चांगलाच...

Jammu Kashmir: दडून बसलेल्या दहशतवाद्यांची आता खैर नाही; कोब्रा कमांडो शिकवणार चांगलाच धडा

Subscribe

दक्षिण काश्मिरमधील अनंतनागच्या जंगलात अड्डे बनवून दहशतवादी कारवाया केल्या जात आहे. या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय सैन्य आणि जम्मू पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे.

नवी दिल्ली : दक्षिण काश्मिरमध्ये सध्या भारतीय सैन्याची दहशतवाद्यासोबत चकमक सुरु आहे. दोन दिवसापूर्वीच सैन्यातील महत्वाचे तीन अधिकारी शहीद झाले होते. त्यानंतरही अधून-मधून गोळीबार होत आहे. तर काही दशतवादी हे दडून बसलेले असून, त्यांचा शोध घेतल्या जात आहे. आता मात्र, त्यांचा शोध लावून खात्मा करण्यासाठी कुपवाडात सीआरपीएफचे कोब्रा कमांडो तैनात करण्यात आले आहे. (Jammu Kashmir No more terrorists in hiding Cobra Commando will teach a good lesson)

दक्षिण काश्मिरमधील अनंतनागच्या जंगलात अड्डे बनवून दहशतवादी कारवाया केल्या जात आहे. या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय सैन्य आणि जम्मू पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. यातच दहशतवाद्यांनी जंगलांना अड्डे बनविल्याने आता कोब्रा कमांडोंनाच उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोब्रा कमांडोंच्या पहिल्या बॅचने नुकतेच जम्मूच्या जंगलात प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या कमांडोंना कुपवाडामध्ये तैनात करण्यात आले आहे.

कोब्रा कमांडोना काश्मीरमध्ये पाठविण्याची पहिलीच वेळ

- Advertisement -

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा कमांडोच्या पहिल्या तुकडीने जम्मू-काश्मीरच्या जंगलात प्रशिक्षण पूर्ण केले असून, कुपवाडा येथे तैनात करण्यात आले आहे. माओवादी बंडखोरांशी लढण्यासाठी 2009 मध्ये स्थापन करण्यात आलेली कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट अॅक्शन (CoBRA) मध्य आणि पूर्व भारतातून काढून जम्मू आणि काश्मीरमध्ये पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रानंतर आता कर्नाटकातही वाहतायेत सत्तांतराचे वारे! दावे-प्रतिदाव्यांना आला वेग

बिहार- झारखंडमध्ये केला नक्षलवाद्यांचा बिमोड

- Advertisement -

बिहार आणि झारखंडमधून काही कोब्रा कंपन्या अंशतः मागे घेण्यात आल्या कारण तेथे नक्षलवादी हिंसाचाराची प्रकरणे कमी झाली. सहा महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या जंगलात त्याचे प्रशिक्षण सुरू झाले. आता प्रशिक्षण संपले आहे आणि त्यांना कुपवाडा येथे तैनात करण्यात आले आहे, परंतु ते अद्याप कोणत्याही ऑपरेशनमध्ये वापरले गेले नाहीत.

यामुळे केली होती कोब्रा पथकाची स्थापना

कोब्राची स्थापना अशा वेळी झाली जेव्हा भारताची अंतर्गत सुरक्षा नक्षलवादी हिंसाचारामुळे धोक्यात आली होती. गेल्या काही वर्षात कोब्राच्या पथकांनी आघाडीच्या नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यांच्या मोहिमांमुळे नक्षलवादी हिंसाचार कमी झाला आहे. जंगल आणि डोंगराळ भागात दहशतवाद्यांशी मुकाबला करायचा झाल्यास ते त्यात तज्ज्ञ असतात. जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील ठिकाणे जवळपास सारखीच आहेत. ते येत्या काही वर्षांत अशाच ठिकाणी वापरले जाणार आहेत.

हेही वाचा : Bjp AIADMK Tension : अण्णा द्रमुकच्या ज्येष्ठ नेत्याचे भाजपसोबतच्या युतीबाबत मोठे वक्तव्य; म्हणाले…

कॉग्रेसच्या काळात मिळाली होती मंजुरी

ऑक्टोबर 2009 मध्ये जेव्हा अनेक नक्षलवादी हल्ले झाले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी माओवाद्यांना भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा सर्वात मोठा धोका असल्याचे सांगितले होते. त्याच्या काही महिन्यांपूर्वी, सप्टेंबर 2008 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने सीआरपीएफमध्ये 10 अतिरिक्त बटालियनच्या निर्मितीसह स्वतंत्र दलाच्या निर्मितीला मंजुरी दिली होती.

- Advertisment -