घरताज्या घडामोडीश्रीनगर : दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Subscribe

श्रीनगरमध्ये सुरु असलेल्या दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

जम्मू-काश्मीरच्या सीमाभागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती सुरुच आहेत. या खुरापती सुरु असताना आज श्रीनगरमधील परिम पोरा भागातील लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे एक जवान शहीद झाले असून जवानांकडून देण्यात आलेल्या चोख प्रत्युत्तरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. विशेष म्हणजे या परिसरात जवानांनी राबवलेल्या शोधमोहीमेनंतर एका जखमी दहशतवाद्यास पकडण्यात देखील जवानांना यश आले आहे. तसेच घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये चकमकी दरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. दरम्यान, दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी पळ काढत जंगलाच्या दिशेने पसरा झाले होते. त्यावेळी करण्यात आलेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. तसेच या चकमकीत एक पोलीस देखील जखमी झाला होता.


हेही वाचा – ‘७ दिवसांत काय ते ठरवा’, निर्भयाच्या दोषींना अखेर कोर्टाचाच शेवटचा अल्टिमेटम!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -