घरदेश-विदेशJammu Kashmir : पंतप्रधान मोदींच्या जम्मू दौऱ्यापूर्वी सुरक्षा दल अलर्ट मोडवर; CISF...

Jammu Kashmir : पंतप्रधान मोदींच्या जम्मू दौऱ्यापूर्वी सुरक्षा दल अलर्ट मोडवर; CISF च्या 13 तुकड्या तैनात

Subscribe

सुरक्षा दलांना सतत माहिती मिळत होती की, पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी दहशतवाद्यांना जम्मू शहरात मोठा घातपात घडवून आणायचा होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांनी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर येत आहेत. 370 कलम रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा असून यानिमित्ताने जम्मू- काश्मीर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात आली आहे, असे असतानाही आज पहाटे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीनंतर आका सीआयएसएफचे डीआयजी डॉ. अनिक पांडे यांनी सांगितले की, आमच्या 13 तुकड्या जम्मू-काश्मीरमध्ये कायदा आणि सुवस्था सुधारण्यासाठी कर्तव्यावर आहेत. सीआयएसएफला आऊटर कॉर्डन परिसरात तैनात करण्यात आले असून दहशतवादविरोधी शोध मोहिम सुरु आहे.

दरम्यान आज जम्मूजवळ सुंजवान छावणी भागात जैश-ए-मोहम्मदचे काही दहशतवादी लपून बसले असून ते जम्मूमध्ये हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार परिसरात शोध मोहिम सुरु करण्यात आली. यावेळी पहाटे ४.१५ वाजता काही जवान बसने त्या भागात पोहचत असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला, यात सुरक्षा दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी शहीद झाले. तर चार जवानही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हे जवान सुजवान येथे झालेल्या हल्ल्यानंतर मदत कार्यासाठी जात होते,

- Advertisement -

सुरक्षा दलांना सतत माहिती मिळत होती की, पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी दहशतवाद्यांना जम्मू शहरात मोठा घातपात घडवून आणायचा होता. या माहितीनंतर, गुरुवारी संध्याकाळपासून जम्मू पोलिसांनी लष्कर आणि निमलष्करी दलांसह शहरातील अनेक भागात शोधमोहीम राबवली. ही शोध मोहीम शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरू होती आणि या कारवाईदरम्यान जम्मूच्या भटिंडी भागात दहशतवाद्यांनी सीआयएसएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर गोळीबार सुरू केला. त्यामुळे या भागात आता CISF च्या 13 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -