जम्मू-काश्मीर: पंपोर येथे दशतवादी हल्ला, CRPFचे दोन जवान शहीद, तीन जखमी

A plot was hatched at Jammu bus stand, 6 kg of explosives were seized
जम्मूत बस स्टॅडवर घातपाताचा कट उधळला, ६ किलोची स्फोटके केली जप्त

दक्षिण काश्मीरमधील पंपोर येथे सुरक्षा दलावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. यामध्ये दोन जवान शहीद झाले असून तीन जखमी झाले आहेत. सध्या जखमी जवानांवर जिल्ह्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच हा परिसर घेरला गेला असून सध्या शोध येथे मोहीम सुरू आहे. दरम्यान हा हल्ला झाल्यानंतर येथील महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.

जम्मू काश्मीरमधील पंपोर बायपास तैनात असलेल्या सीआरपीएफच्या रोड ओपनिंग पार्टीवर काही दहशतावाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये पाच जवान जखमी झाले होते. या पाच जवानांना उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचार दरम्यान दोन जवानांचा मृत्यू झाला.

याआधी २७ सप्टेंबरला पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील सांबुरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. सुरक्षा दलाला दोन ते तीन दहशवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर कारवाई करण्यात आली आणि यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकी दरम्यान एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता.


हेही वाचा – कोरोनावर मात करण्यासाठी ट्रम्प यांना दिलं भारतात तयार केलेलं ‘हे’ स्वस्त औषधं