नवी दिल्लीः Jammu Kashmir News: रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील एका निर्माणाधीन चौपदरी बोगद्याचा काही भाग गुरुवारी रात्री कोसळल्याने त्यात नऊ जण अडकलेत, त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले आहे. इतर सात जणांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. खुनी नाल्यातील बोगद्याच्या समोरचा एक छोटासा भाग कोसळला. पोलीस आणि लष्कराने तातडीने संयुक्त बचाव मोहीम सुरू केली. दोन जणांना वाचवण्यात यश आले असून, सात लोक अजूनही बोगद्यात अडकले आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी रामबनचे उपायुक्त, प्रकल्प संचालक, डीआयजी आणि एसएसपी उपस्थित होते.
त्यामुळे जवळपास 9 मजूर बोगद्यातच अडकले. अपघातानंतर पोलीस आणि लष्कराचे जवान मोर्चे घेऊन मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. बचाव मोहिमेदरम्यान बोगद्यात अडकलेल्या दोघांची सुटका करण्यात आली आहे. बोगद्यात अजूनही 7 जण अडकले असल्याची माहिती आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगदा कोसळल्याने कर्मचारी केवळ अडकले नाहीत, तर बोगद्यातील अनेक वाहनांचेही नुकसान झाले. यावेळी उपायुक्त, प्रकल्प संचालक, डीआयजी आणि एसएसपी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
Jammu & Kashmir | A part of an under-construction tunnel collapsed at Khooni Nala, Jammu–Srinagar National Highway in the Makerkote area of Ramban. 6 to 7 feared trapped; one person rescued. Rescue operation is underway: Ramban Deputy Commissioner
— ANI (@ANI) May 19, 2022
या दुर्घटनेत बुलडोझर आणि ट्रकसह अनेक मशीनचेही नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी रात्री उशिरा ऑडिटदरम्यान बोगद्याचा काही भाग कोसळला होता. अपघातानंतर रामबनचे उपायुक्त मसरतुल इस्लाम, वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहित शर्मा यांच्यासह प्रकल्पाचे संचालक उपस्थित होते. त्यांच्या देखरेखीखाली मदत आणि बचावकार्य सुरू आहे. त्याचबरोबर जखमींना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी आणि त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवता यावे, यासाठी रुग्णवाहिका घटनास्थळी मागवण्यात आली आहे.
हेही वाचाः 6 राज्यांवर 75000 कोटींची थकबाकी, परतफेड न केल्यास वीजपुरवठा खंडित, ऊर्जा सचिवांचे पत्र