जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामधून एका दहशतवाद्याला अटक; रायफलसह मोठा शस्त्रसाठा जप्त

यापूर्वी 20 ऑगस्ट 2022 रोजी जम्मू काश्मीर पोलिसांनी लष्कर ए- तोय्यबाच्या दोन हायब्रीड दहशवाद्यांना अटक केली होती. या दहशतवाद्यांचे वाहन पोलिसांनी जप्त केले

jammu kashmir police arrested terrorist from baramula district today

जम्मू काश्मीर : देशाची आर्थिक राजधानी मुंबईला ‘२६/११’ सारख्या हल्ल्याची धमकी देण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणा आता अलर्ट मोडवर आल्या आहेत. यात जम्मू काश्मीरमध्येही दहशतवाद्यांकडून भारतविरोधी कारवाया सुरु आहेत. यामुळे सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांविरोधात तिथे सातत्याने सर्च ऑपरेशन सुरु आहे. यात शनिवारी जम्मू काश्मीर पोलिसांनी उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातून एका दहशतवाद्याला शस्त्रास्त्रांसह बेड्या ठोकल्या आहेत. बांदीपोरा पोलीस पथक आणि लष्कराच्या संयुक्त पथकामुळे या दहशतवाद्याला अटक करण्यात यश आले आहे.

काश्मीर झोन पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. पोलिसांनी ट्विट करून लिहिले की, बांदीपोरा पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने बारामुल्ला येथून एका दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याच्याकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. इम्तियाज अहमद बेग उर्फ इना भाई असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो बेग मोहल्ला बारामुल्लाचा रहिवासी आहे.

या दहशतवाद्याकडून एक एके-47 रायफल, दोन एके मॅगझिन आणि 59 एके राऊंडसह अशी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. यापूर्वी 20 ऑगस्ट 2022 रोजी जम्मू काश्मीर पोलिसांनी लष्कर ए- तोय्यबाच्या दोन हायब्रीड दहशवाद्यांना अटक केली होती. या दहशतवाद्यांचे वाहन पोलिसांनी जप्त केले. अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांची नावे साहिल वानी आणि अल्ताफ फारुख उर्फ ​आमिर अशी आहेत. या दोन दहशतावद्यांनी 15 ऑगस्ट रोजी गोपाळपोरा येथे अल्पसंख्यांत समुदायावर ग्रेनेड हल्ला केला होता. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये जवान अनेक दहशतवादी कारवायांचा सामना करत आहेत. 18 ऑगस्ट रोजी देखील जम्मू-काश्मीर पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले. मोहम्मद अली हुसैन असे या कमांडरचे नाव होते.


हिमाचल प्रदेशमध्ये पुराचा कहर, ठिकठिकाणी भूस्खलन, आत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू