घरदेश-विदेशटेरर फंडिंगप्रकरणी SIA ची जम्मू-काश्मीरमध्ये छापेमारी; महत्त्वाची कागदपत्रं हाती लागण्याची शक्यता

टेरर फंडिंगप्रकरणी SIA ची जम्मू-काश्मीरमध्ये छापेमारी; महत्त्वाची कागदपत्रं हाती लागण्याची शक्यता

Subscribe

टेरर फंडिंग प्रकरणी शुक्रवारी राज्य तपास यंत्रणा एसआयएने (SIA) श्रीनगरसह अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीदरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्र हाती लागण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमधील अनेक ठिकाणी अद्याप ही छापेमारी सुरु आहे.

कुपवाड जिल्ह्यातील हायहामा, क्रालपोरा, मिरनाग, लोलाब आणि सुलकूटमध्ये यापूर्वी जानेवारी महिन्यात दहशतवाद्यांच्या वाढत्या दहशतवादी कारवायांसंबंधी कारवाई करण्यात आली. यावेळी यंत्रणेने कारवाई करत दशवाद्यांच्या नातेवाईकांच्या घरातून अनेक मोबाईल फोन, आणि इतर महत्त्वाची कागदपत्र जप्त केली आहेत.

- Advertisement -

न्यायालयाकडून सर्च वारंट मिळाल्यानंतर एसआययूनेही कारवाई केली आहे. यावेळी जिल्ह्यात असलेल्या दहशवतादी घटकावर आणि पाकिस्तानातून घुसखोरी करून आलेल्या दहशतवाद्यांवरील ही कारवाई दहशतवाद संपवण्याच्य दिशेने असलेले पाऊल आहे.

कुपवाडमध्ये जवळपास 8 दहशतवाद्यांच्या नातेवाईकांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. जे बेकायदेशीररित्या एलओसी लाईन ओलांडून दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाले.


‘नशीब बलवत्तर म्हणून वाचलो’, अपघातानंतर दिग्दर्शक प्राजक्त देशमुखने ट्विटरवर केला संताप व्यक्त

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -