जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

कुपवाडा येथे लष्कराचे २ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना कुपवाडा (Kupwara) येथे मोठे यश मिळाले आहे. येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. लष्कर-ए-तोयबा (LeT) या प्रतिबंधित दहशतवादी (Terrorists) संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये पाकिस्तानी दहशतवादी (Pakistani Terrorist) तुफैलचा (Tufail) समावेश आहे. काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार (IGP Vijay Kumar) यांनी सांगितले की, चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून, त्यापैकी एक पाकिस्तानी दहशतवादी तुफैलचाही समावेश आहे.

कुपवाडा येथील चकतारस कंदी येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने नाकाबंदी सुरू केली. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या भागात अजूनही दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.

हेही वाचा : संरक्षण क्षेत्रात भारताचे आत्मनिर्भरतेच्या दिशेने पाऊल; 76 हजार कोटींच्या स्वदेशी शस्त्रास्त्र खरेदीला मंजूरी

कुपवाडा येथे लष्कराचे २ दहशतवादी ठार

काश्मीर झोनचे आयजीपी IGP विजय कुमार यांनी सांगितले की, एलईटीचे दोन दहशतवादी मारले गेले आहेत. यामध्ये पाकिस्तानी दहशतवादी तुफैलचाही हात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. परिसरात लष्कर आणि पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. याआधी सोमवारी बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा एक पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला, तर तीन दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून एक एके – 47 रायफल, ५ मॅगझिन आणि अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑल आऊट

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) ऑपरेशन ऑल आऊट (Operation All Out) अंतर्गत, मागील ५ वर्षांत ९०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, २०१८ मध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत २५७ दहशतवादी ठार झाले आहेत.२०१९ मध्ये १५७ दहशतवाद्यांना जवानांनी ठार केले. २०२० मध्ये २२१ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर २०२१ मध्ये १९३ दहशतवादी मारले गेले होते, तर यावर्षी ६ जूनपर्यंत ९६ दहशतवादी मारले गेले आहेत.


हेही वाचा : राज्यातील ६ जिल्ह्यांत कोरोना रुग्णांमध्ये वाढ