घरदेश-विदेशसेक्स स्कँडल प्रकरणात बीएसएफच्या माजी अधिकाऱ्याला १० वर्षांचा कारावास

सेक्स स्कँडल प्रकरणात बीएसएफच्या माजी अधिकाऱ्याला १० वर्षांचा कारावास

Subscribe

जम्मू – काश्मिरमधील श्रीनगरच्या सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपींना चंदीगढ सीबीआय कोर्टाने १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील दोषी माजी डीजीपी के एस. पाढी आणि डीएसपी मोहम्मद अशरफ मीर यांना प्रत्येकी १ लाख रूपये तर अन्य तीन आरोपींना ५० हजार रूपयांना दंड ठोठावण्यात आला आहे. तब्बल १२ वर्षांपूर्वी श्रीनगर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी निकाल देताना ही शिक्षा सुनावण्यात आली.

गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्यासाठी समाजातील कुप्रवृत्ती कारणीभूत आहे. अशा घटनांमधील पीडित मुलांना शारिरीक आणि मानसिक तणावातून जावं लागतं. एका प्रकारातून सुरू झालेल्या सेक्स स्कँडलची नंतर साखळीच तयार होते. अशा घटनांना आळा बसणे गरजेचे आहे.
– गितांजली गोयल, सीबीआय कोर्ट, चंदीगढ

कोण आहेत आरोपी?
बलात्कार प्रकरणात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) चे माजी पोलीस उप महानिरीक्षक (डीजीपी) के. एस. पाढी, माजी पोलीस अधीक्षक मोहम्मद अशरफ मीरसह तीन स्थानीक युवक शब्बीर अहमद लेवाय, शब्बीर अहमद लांगहू आणि मौसाद अहमद यांना कोर्टाने दोषी ठरवलं होतं. तर जम्मू काश्मिरचे माजी अॅडिशनल अॅव्होकेट जनरल अनिल सेठी आणि हॉटेल मालक मेहराज उद दीन मलिक यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

- Advertisement -

काय आहे हे सेक्स स्कँडल? 
श्रीनगरमध्ये २००६ साली एका १५ वर्षीय मुलीची पोर्नोग्राफिक सीडी पोलिसांना सोपवण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील काही व्हीव्हीआयपी लोकांचा सेक्स स्कँडलशी असलेला संबंध चव्हाट्यावर आला. पोलिसांनी या प्रकरणी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचे सदस्य सरगना सबीनासह आणखी दोन मुलींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सेक्स स्कँडलमध्ये ५६ लोकांचा समावेश असल्याचे उघड झाले. पती अब्दुल हमीद बुल्लाहसह सबीना हे सेक्स रॅकेट चालवत होती. त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला. कोर्टात केस सुरू असतानाच दोघांचाही मृत्यू झाला. याच बहुचर्चित सेक्स स्कँडल प्रकरणामुळे जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्लाह यांनी २००९ साली पदाचा राजीनामा दिला होता.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -