घरदेश-विदेशश्रीनगर चकमकीत दोन दहशतवादी ठार; दहशतवादी रईस ऑनलाइन पोर्टलचा माजी संपादक

श्रीनगर चकमकीत दोन दहशतवादी ठार; दहशतवादी रईस ऑनलाइन पोर्टलचा माजी संपादक

Subscribe

श्रीनगर डाउन-टाउनच्या रैनावरी भागात मंगळवारी मध्यरात्री झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. चकमकीच्या ठिकानाहून शस्त्रे आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. ठार झालेले दोन्ही दहशतवादी स्थानिक असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यापैकी एक दहशतवादी शाहबाद वीरी बिजबेहारा येथील रहिवासी अब्दुल हमीद भट याचा मुलगा रईस अहमद भट हा पूर्वी पत्रकार होता. ऑगस्ट 2021 मध्ये दहशतवादी संघटनेत सामील होण्यापूर्वी तो व्हॅली न्यूज सर्व्हिस या खोऱ्यात कार्यरत असलेल्या ऑनलाइन पोर्टलचा मुख्य संपादक म्हणून काम करत होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, रईस गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अचानक बेपत्ता झाला. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला. यावेळी रईस हा दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयब्बामध्ये सामील झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान त्याच्याविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. दरम्यान त्याचा सी श्रेणीतील दहशतवाद्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी चकमकीत ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख हिलाल अहमद राह उर्फ ​​शब्बू मुलगा सफिर अहमद अशी आहे. हा देखील गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घरातून बेपत्ता झाला आणि त्यानंतर तो लष्कर-ए-तोयब्बा या दहशतवादी संघटनेत सामील झाला. त्याला देखील पोलिसांनी दहशतवाद्यांच्या सी श्रेणीच्या यादीत ठेवले होते.

- Advertisement -

रात्री उशिराच रैनावरी येथे दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावेळी मध्यरात्री सुरक्षा दलाची शोध मोहिम सुरु असताना एका ठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांनी प्रत्युत्तर देण्याआधी दोन दहशतवाद्यांना अनेक वेळा आत्मसमर्पण करण्याची संधी दिली, परंतु त्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. रात्री 12.45 वाजता चकमक सुरू झाली जी सुमारे एक तास चालली आणि दोन्ही दहशतवादी मारले गेले. गोळ्यांनी छिन्नविछिन्न झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेहही सापडले आहेत.

सकाळी सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली. या भागात इतर कोणतेही दहशतवादी नसल्याची पुष्टी झाल्यावर सुरक्षा दल दहशतवाद्यांचे मृतदेह आणि चकमकीच्या ठिकाणाहून जप्त केलेली शस्त्रे घेऊन निघून गेले.

- Advertisement -

सोपोरमध्ये बुरखा घातलेल्या व्यक्तीने CRPF ब्लॉकवर फेकला पेट्रोल बॉम्ब

जम्मू -काश्मीरमध्ये पोलीस आणि लष्करी जवानांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे.दहशतवादी सातत्याने सुरक्षा दलांना लक्ष्य करत आहेत. अशात उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरे शहरात मंगळवारी संध्याकाळी एका बुरखा घातलेल्या व्यक्तीने सीआरपीएफ ब्लॉकवर पेट्रोल बॉम्ब फेका आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. संशयिताने आधी पेट्रोलने भरलेली बॅग जाळली आणि ती सुरक्षा दलाच्या ब्लॉक फेकली.


हेही वाचा : दिल्लीच्या रोहिणी भागातील नाल्यात अडकून 4 जणांचा मृत्यू: केबल दुरुस्तीचे करत होते काम


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -