पंतप्रधान मोदींची दाढी झटकली तर ५० लाख घरं पडतील; भाजप खासदाराचं अजब वक्तव्य

Janardan Mishra said If PM Narendra Modi shakes his beard, 50 lakh houses fall

मध्य प्रदेशमधील रीवा येथील भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अजब विधान केलं आहे. पंतप्रधान मोदींची दाढी झटकली तर ५० लाख घरं पडतील, असं अजब वक्तव्य खासदार मिश्रा यांनी केलं. जनार्दन मिश्रा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये भाजप खासदार त्यांच्या स्थानिक बोलीभाषेत बोलताना दिसत आहेत. जोपर्यंत देशातील प्रत्येक व्यक्तीला पंतप्रधान निवास योजनेतून घर मिळत नाही, तोपर्यंत मोदींच्या दाढी घरं पडत राहतील. मोदींच्या दाढीत घरंच घरं आहेत. ते पुढे म्हणाले की, जोपर्यंत दाढी आहे तोपर्यंत कोणीही घराविना राहणार नाही. मोदींनी एकदा दाढी झटकली की ५० लाख घरे पडतात. पुन्हा दाढी झटकली तर १ कोटी घरे बाहेर पडतात. जेव्हा व्हा आमदार सांगतील तेव्हा तेव्हा दाढीतून घरं पडतील, असं जनार्दन मिश्रा म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थित लोकांना सांगितलं की तुम्ही लोक मोदींच्या दाढीकडे बघा. जेव्हा तुम्ही बघायचं बंद कराल तेव्हा तुम्हाला घर मिळणंही बंद होईल, असं अजब वक्तव्य जनार्दन मिश्रा यांनी केलं.

जनार्दन मिश्रा यांनी हे सांगताच उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवल्या. तसंच त्यांच्या या वक्तव्याने एकच हसा पिकला. यावेळी स्थानिक आमदार केपी त्रिपाठीही उपस्थित होते. भाजप खासदाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर भाजप खासदारानेही आपले स्पष्टीकरण दिलं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ ३ नोव्हेंबरचा आहे, जेव्हा भाजपचे खासदार त्यांच्या भागातील एका रस्त्याच्या पायाभरणी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना भाजप खासदार म्हणाले की, लोकांच्या मनातील पंतप्रधान निवास योजना संपल्याची भीती दूर करण्यासाठी लोकांना समजावून सांगितलं.

मात्र, भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांची अजब वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही भाजपच्या एका खासदाराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये त्यांनी रीवाच्या महापालिका आयुक्तांना जिवंत गाडल्याचं म्हटलं होतं. प्रत्येकाने घरात कुदळ आणि कुऱ्हाड धारदार ठेवा, मनपा आयुक्त पैसे मागायला आले तेव्हा खड्डा खणून त्यात टाका, असं खासदार व्हायरल व्हिडिओमध्ये लोकांना सांगत होते.