नवी दिल्ली : गेल्या काही कळापासून जन्मदरात होणारी घट जगातील अनेक देशांमध्ये मोठी समस्या बनताना दिसत आहे. वाढती महागाई, मुलांचे संगोपन तसेच इतर अनेक गोष्टींमुळे नागरिक मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करत आहे. यामुळे प्रजनन दरात चिंताजनक घट झाल्यामुळे जन्मदरही घटला आहे. याचा फटका लोकसंख्या वाढीला बसताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर जपानची राजधानी टोकियोमध्ये जन्मदर सुधारण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. (Japan capital Tokyo to introduce four-day week to improve birth rate)
लोकसंख्या वाढीसाठी तसेच मुले जन्माला घालण्यासाठी टोकियो सरकारने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 3 दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. टोकियोचे राज्यपाल युरिको कोइके यांनी जाहीर केले आहे की, कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी घेण्याचा पर्याय देण्यात आला आहे. जेणेकरून त्यांना मुले होऊ शकतील आणि यामुळे देशाचा घटता जन्मदर सुधारायला मदत होईल. तसेच कामाची सोपी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. जेणेकरून बाळाला जन्म दिल्यामुळे किंवा त्याची काळजी घेताना कोणीही आपले करिअर सोडू नये, याची आम्ही काळजी घेऊ. महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमामुळे जोडप्यांना प्रोत्साहन देऊन जपानी लोकांमध्ये बाळंतपणाचा धोका कमी होण्यास मदत होईल.
हेही वाचा – Supreme Court on Atul Subhash : कायद्याचा गैरफायदा घेऊ नका; न्यायालयाने महिलांना फटकारले
चार दिवसांचा आठवडा कधीपासून?
पुढील वर्षी एप्रिलपासून टोकियोमधील कर्मचाऱ्यांना मुले जन्माला घालण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. अशा परिस्थितीत त्यांना आठवड्यातून फक्त 4 दिवस काम करावे लागणार आहे, अशी माहिती राज्यपाल कोईके यांनी दिली.
जपानचा जन्मदर कमी होण्याचे कारण काय?
दरम्यान, गेल्या वर्षी जपानमध्ये केवळ 7,27,277 जन्मांची नोंद झाली होती. देशाच्या ओव्हरटाइम वर्क कल्चर जपानचा जन्मदर सातत्याने कमी होत असल्याचे म्हटले जात आहे. कारण महिलांना करिअर आणि कुटुंब यापैकी एकाची निवड करावी लागते. तसेच जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, जपानमध्ये लैंगिक रोजगार असमानता इतर श्रीमंत राष्ट्रांच्या तुलनेत जास्त आहे. ज्यामध्ये महिलांचा सहभाग 55 टक्के आणि पुरुषांचा सहभाग 72 टक्के आहे.
हेही वाचा – Covid Vaccine : कोविडच्या लसीमुळे तरुणांचा मृत्यू; सरकारने संसदेत दिली ही माहिती