घरताज्या घडामोडीजपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंच्या निधनावर जगभरात हळहळ, तर चीनमध्ये जल्लोष

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंच्या निधनावर जगभरात हळहळ, तर चीनमध्ये जल्लोष

Subscribe

चीनमध्ये आबे यांच्या मृत्युवर अघोरी आनंद व्यक्त करण्यात येत असून सोशल मीडियावर चीनी यूजर्स अत्यंत हीन दर्जाच्या कमेंट्स करत आहेत

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे Shinzo Abe (६७)  यांच्यावर नारा येथे आज सकाळी एका व्यक्तीने गोळीबार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला असून हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. या घटनेने जगभरात खळबळ उडाली असून शिंजो आबे यांच्याप्रती हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मात्र चीनमध्ये आबे यांच्या मृत्युवर अघोरी आनंद व्यक्त करण्यात येत असून सोशल मीडियावर चीनी यूजर्स अत्यंत हीन दर्जाच्या कमेंट्स करत आहेत. चीनमध्ये आबे यांच्याविरोधात हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

- Advertisement -

शिंजो आबे सकाळी नारा येथे रस्त्यावरच जनतेला संबोधित होते. त्याचवेळी हल्लेखोराने त्यांच्यावर पाठीमागून गोळीबार केला. यात शिंजो यांच्या पाठीतून दोन गोळ्या थेट त्यांच्या हृदयात घुसल्या. त्यानंतर ते खाली कोसळले . त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मात्र आबे यांच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त प्रसारित झाल्यापासूनच चीनमधील नागरिकांनी सोशल मीडियावर त्यांना लवकर मृत्यू येऊ दे अशा प्रार्थना करणाऱ्या पोस्ट टाकायला सुरुवात केली होती. तर काहींनी त्यांच्यावरील हल्ल्याचीही खिल्ली उडवली.

- Advertisement -

चीनी सोशल मीडिया Weibo आणि WeChat वर हे सगळे सुरू असून मानवतेला काळीमा फासणारे कमेंटस येथे चीनी नागरिक करत आहेत. एखाद्या देशाच्या मुख्य व्यक्तीच्या मृत्यूवर अशा प्रकारे कमेंट्स करण्याची बहुधा ही पहीलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

चीन आणि जपान यांच्यात जुनेच शत्रुत्व आहे. महायु्द्धावेळी पहील्यांदाच दोन्ही देश एकमेकांविरोधात समोरा समोर उभे ठाकले होते. काही दिवसांपूर्वी दक्षिण चीनवरूनही दोन्ही देशांमध्ये शीतयु्द्ध सुरू झाले होते. चीनमधील जनतेला शिंजो आबे आवडत नाहीत. कारण शिंजो आबे यांचे भारत आणि तैवानबरोबर मैत्रीपूर्व संबंध होते. तसेच शिंजो यांनीच ऑस्ट्रेलिया, अमेरिका, भारत आणि जपान यांना एकत्र आणून QUAD ही संघटना तयार केल्याचा रागही चीनला आहे. दरम्यान, चीनमध्ये सोशल मीडियावर आबे यांच्याविरोधात ‘#安倍无生命体征’ हॅशटॅग चालवत आहेत. आबे यांच्या जगण्याची शक्यताच नाही या हॅशटॅगखाली चीनी नागरिक हीन कमेंटस करत आहेत. तर काहींनी आबे यांच्याप्रमाणेच कोरियाच्या पंतप्रधानांची हत्या होणार असे पोस्ट करत आहेत. तर काहीजण आबे यांच्या हत्या करणाऱ्या हल्लेखोराचे अभिनंदन करत आहेत. आबे यांच्या मृत्यूला जपानचे अमेरिकीकरणच जबाबदार असल्याचे काहीजणांनी कमेंटसमध्ये म्हटले आहे.

विशेष म्हणजे जपानमध्ये बंदूक मिळवणे कठीण आहे. कारण येथे गोळीबाराच्या घटना दुर्मिळ आहेत. शस्त्र बाळगाण्यासाठी अत्यंत कठीण चाचण्या येथे घेतल्या जातात. पण तरीही हल्लेखोरांने बंदूक कशी मिळवली यावर आता जपानमध्ये चर्चा होत आहेत. आबे यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यांचे सुरक्षा रक्षकही त्यांच्याबरोबर होते. पण तरीही हल्लेखोराने जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामुळे आबे यांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही जपानी नागरिकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. दरम्यान, जपानच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ असणारे व्यक्ती म्हणून शिंजो आबे यांची नोंद झाली आहे. त्यांनी २००६ ते २००७ पर्यंत आणि नंतर २०१२ ते २०२० पर्यंत पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळली .

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -