घरक्रीडाcoronavirus : जपानला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका, ऑलिंपिक स्पर्धा होणार रद्द?

coronavirus : जपानला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका, ऑलिंपिक स्पर्धा होणार रद्द?

Subscribe

चौथ्या लाटेचा जपानवर इतका वाईट परिणाम का झाला?

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणुच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात असतानाच जपानमध्ये कोरोनाच्या चौथी लाटेना हाहाकार उडवून दिला आहे. जपानमध्ये सात दिवसांत कोरोना संसर्गाची सरासरी १ हजारपेक्षा कमी प्रकरणे नोंदवली गेली. मार्च २०२१ मधील ही आकडेवारी पाहता जपानच्या आरोग्य तज्ज्ञांनी असा विश्वास व्यक्त केला की, गेल्या वर्षभरात जपानने कोरोनाच्या तिसऱ्य लाटेवरही यशस्वी मात केली. यात कोरोना रुग्णसंख्येत सतत घट होत असल्याने जपानने जुलै २०२१ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धा २०२१ चे आयोजन करण्याची तयारी सुरु केली. मात्र एप्रिल महिन्यात कोरोनाची स्थिती बदलू लागली आणि जपानमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचा जोर वाढू लागला. जॉन हॉपकिन्स विद्यापीठानुसार, ८ मेदरम्यान जपानमध्ये जानेवारी महिन्यात पहिल्यांदा कोरोना संसर्गाची प्रकरणे ७ हजारांवर पोहचली. तर सध्या यात देशात सात दिवसातील कोरोना रुग्णसंख्येची सरासरी ४४४६ इतकी आहे.

जपानमधीन अनेक भागात आपत्कालीन परिस्थितीची घोषणा

जपानमध्ये सतत वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांनी नऊ शहारांमध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर केली. यात टोकिया शहाराचीही समावेश आहे, जिथे जुलैमध्ये ऑलिंपिक स्पर्धा २०२१ पार पडणार आहे. जपानमध्ये दरदिवसा ४ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे येथील अनेक शहारांतील आरोग्य यंत्रणा डबगाईला आली आहे.

- Advertisement -

रुग्णसंख्येचा विस्फोट

जपानमधील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या ओसाकामधील रुग्णालयातील सर्व बेड्स भरले आहेत. देशातील सुमारे ३५००० लोकांना कोरोनाने ग्रासले आहे. अनेक रुग्णांची उपचारांपूर्वीच गंभीर स्थिती असून अनेकांचा मृत्यू होत आहे.

चौथ्या लाटेचा जपानवर इतका वाईट परिणाम का झाला?

जपानमध्ये सध्या लसीकरण मोहिम खूप धिम्यागतीने सुरु आहे. यात इइतर विकसित देशांच्या तुलनेत जपानमध्ये लसीकरण खूप उशीरा म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सुरु झाली. यात जपान सरकारने या आठवड्यापासून टोकियो आणि ओसाकामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू केली आहे. ज्यामुळे केवळ २.४ टक्के लोकांचेच संपूर्ण लसीकरण झाले आहे.

- Advertisement -

ऑलिम्पिक स्पर्धेच्या सुरुवातीपर्यंत जपानमधील ६५ पेक्षा अधिक वयस्कर नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे जपान सरकारचे उद्दीष्ट आहे. सध्या सध्या टोकियोमध्ये दररोज ५००० आणि ओसाकामध्ये २५०० लोकांना लसी देण्याची योजना आखली जात आहे. जून आणि जुलैमध्ये ही क्षमता दुप्पट होईल. आतापर्यंत जपानमधील वृद्ध लोकांपैकी (65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या) ४.७ टक्के लोकांनाच लसीचा कमीतकमी एक डोस मिळाला आहे.

ऑलिंपिक स्पर्धा २०२१ होणार रद्द ?

कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी ऑलिंपिक स्पर्धा वर्षाभरासाठी पुढे ढकलण्यात आली होती. यात जगभरातून कडक टीका होत असतानाही यावर्षी टोकियो ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. जपानमध्ये सध्या कोरोना संसर्ग वाढत असल्याने अनेक आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजित करण्यास विरोध वाढला आहे. व्हायरल झालेल्या ट्विटमध्ये सॉफ्टबँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मासायोशी सोन म्हणाले की, ८० टक्क्यांहून अधिक लोकांची इच्छा आहे की, ऑलिंपिक स्पर्धा पुढे ढकलण्यात याव्या किंवा रद्द व्हाव्या. मग या स्पर्धा कोणाद्वारे व कोणत्या अधिकाराने आयोजित केले जात आहेत?

जपानच्या आरोग्य संघटनांनी लिहिले खुले पत्र

जपानमधील ६ हजारांपेक्षा अधिक डॉक्टरांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनेने आपल्या वेबसाईटवरून जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांना एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी टोकियो ऑलिंपिक स्पर्धा रद्द करणयाची व्यवस्था करा अशी विनंती केली आहे.

यूएस-सीडीसीने दिला इशारा

युनायटेड स्टेट्स सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने असे म्हटले आहे की, अनेक विदेशी प्रवाश्यांनी जपानमध्ये येणे टाळा. कारण जपानमधील कोरोनास्थिती अत्यंत गंभीर होत असून कोरोनाविरोधी लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे संसर्गाचा धोका आहे.


Monsoon Update : मुंबई, ठाणे, नवी मुंबईत वातावरण ढगाळ राहणार, हलक्या पावसाच्या सरींची शक्यता


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -