स्कर्टवर फोटो काढला तर थेट ३ वर्षांचा तुरुंगवास, ‘या’ देशात आदेश जारी

महिलांना सुंदर दिसणे, राहणे फार आवडते. त्यामुळे त्या बदलत्या ट्रेंन्डनुसार फॅशन जपण्याचा प्रयत्न करतात. पण जगातील असा एक देश आहे ज्याने महिलांनी स्कर्ट घालून फोटो काढल्यास तर त्यांना चक्क ३ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. हा आदेश जापानने काढला आहे. त्यांनी आदेशात असे म्हटले आहे की, महिलांनी आपत्तीजनक फोटो काढल्यास तर तुरुंगवासासह लाखो रुपयांचा दंड ही ठोठावला जाणार आहे.

या संदर्भातील बिल जापानने आणले असून त्यामागील उद्देश असा की, अपस्कर्टिंग सारख्या महिलांसंबंधित गुन्हांना रोखणे. ब्रिटने आणि युरोपातील काही देशांनी याला आधीच बलात्काराच्या कॅटेगरीत टाकले आहे. या देशांनी यासाठी शिक्षा सुद्धा काय असणार आहे हे ठरवलेय.

अपस्कर्टिंग म्हणजे काय?
अपराधीपणाची मानसिकता असलेली लोक महिलांनी जर शॉर्ट कपडे घातल्यानंतर त्यांच्या परवानगीशिवाय फोटो क्लिक करतात. त्यानंतर ते पॉर्न बेवसाइटवर विक्री करतात. अथवा रिवेंज पॉर्न अंतर्गत त्या महिलेची बदनामी केली जाते. अशाच प्रकारच्या वागण्याला अपस्कर्टिंग असे म्हटले जाते. जापानमध्ये आता याला रेप कॅटेगरीत टाकले आहे. जापानमध्ये याला चिकान असे म्हटले जाते.

जापान टुडेच्या एका रिपोर्टनुसार अशा प्रकारचे अपराध गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी, थिएटर्स आणि स्टेडिममध्ये केले जातात. सर्वाधिक प्रकरणं ही जापान मधील मेट्रो ट्रेनमधील आहेत.
अपस्कर्टिंग पासून बचाव करण्यासाठी सरकार सतर्क झाले आहे.

अपस्कर्टिंग संदर्भात ठळक मुद्दे:
-अपस्कर्टिंगला रेप कॅटेगरीत आणणारा जापान हा पहिलाच आशियाई गेश आहे.
-साउथ कोरियात दोषींना पाच वर्षांच्या शिक्षेसह ६ लाख रुपयांचा दंड ही सुनावला जातो.
-सिंगापुर मध्ये २ वर्षांचा तुरुंगवास आणि दंड. जर गुन्हेगार १४ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या असतील तर त्याला सुद्धा शिक्षा भोगावी लागते.
-ब्रिटेन आणि जर्मनीत २ वर्ष तरी शिक्षा हो
-अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील विविध राज्यांमध्ये अशा प्रकारच्या गुन्हांसाठी कायदा तयार करण्यात आला आहे.


हेही वाचा- वयात येणाऱ्या मुलांबरोबर पालकांनी बेडरूम शेअर करू नये